चोर-पोलिसांच्या टोळीने अनेकांना गंडविले
By Admin | Updated: July 30, 2014 02:00 IST2014-07-30T02:00:34+5:302014-07-30T02:00:34+5:30
आठ दिवसांपूर्वीच मुंबईतील सहाजणांना बाबाने तब्बल 25 लाख रुपयांना असाच गंडा घातला होता.

चोर-पोलिसांच्या टोळीने अनेकांना गंडविले
औरंगाबाद : जादूने पैशांचा पाऊस पाडून तुमचे पैसे चौपट करून देतो, असे आमिष तो बाबा लोकांना दाखवायचा.. पैसे घेऊन लोक आले की, तो जादूचा खेळ मांडायचा.. तितक्यात पोलीस तिथे छापा मारायचे अन् कारवाईची धमकी देऊन सगळे काही घेऊन जायचे.. अशा पद्धतीने लोकांना लुटणा:या चोर-पोलिसांच्या टोळीचा मंगळवारी पर्दाफाश झाला.
सूत्रधार भोंदूबाबा साहेब खान यासीम खान पठाण याच्यासह त्याचे दोन साथीदार आणि सिडको एमआयडीसी ठाण्यातील दोन पोलिसांवर मंगळवारी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या चोर-पोलिसांच्या या टोळीने औरंगाबादेत गेल्या दोन ते तीन महिन्यांत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादेतील नारेगाव येथील साहेब खान हा बाबा पैशांचा पाऊस पाडतो, आपण जितकी रक्कम दिली त्याच्या चारपट अधिक रक्कम तो जादूने करून देतो, असे अकोला येथील दीपक दुर्गादास दुबे यांना एका पानटपरीचालकाने सांगितले. अशफाक हा बाबाचा खास माणूस असून, त्याच्याशी संपर्क करा, काम होऊन जाईल, असे सांगण्यात आले. अशफाकचा मोबाईल नंबरही दिला. दुबे यांच्यासह त्यांचे मित्र पवन स्वामी, प्रविण भालेराव, प्रभाकर वानखेडे, शेख मुजीब खान बाबन (रा. अकोला) व प्रफूल कापडे (रा. पुणो) आमिषाला बळी पडले. (प्रतिनिधी)
बाबाने घेतली पोलिसांची मदत
च्बाबाने पोलिसांच्या मदतीने तीन-चार महिन्यांत राज्यभरातील अनेकांना गंडविले आहे. आठ दिवसांपूर्वीच मुंबईतील सहाजणांना बाबाने तब्बल 25 लाख रुपयांना असाच गंडा घातला होता. तेथेही असेच पोलीस आले आणि कारवाईची धमकी देत ‘डाव’ मोडून निघून गेले.