शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची बॅग चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे स्थानकात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 12:57 IST

लोहमार्ग पोलिसांची कारवाई

डोंबिवली: विदर्भ एक्स्प्रेसमधून बुलढाणा येथील आमदार राहुल बोन्द्रे यांची बॅग चोरी केल्याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अहमद सैय्यद (वय 34, रा.कल्याण) याला अटक केली आहे. ही चोरीची घटना कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी घडली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या सहाय्याने चोराला अटक केली.या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या तपासासाठी एक पथक तैनात करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक ए. एस. शेख त्या प्रकरणी शोध घेत होते. मंगळवारी संध्याकाळीच अहमदला ताब्यात घेण्यात आले होते. सर्व चौकशीअंती रात्री उशिराने त्याला अटक करण्यात आल्याचे बारटक्के यांनी सांगितले. आमदार बोन्द्रे हे त्यांची पत्नी वृषाली बोन्द्रे यांच्यासोबत रविवारी मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईला जाण्यासाठी बसले होते.सोमवारी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान आमदार बोन्द्रे कल्याण स्टेशनला उतरणार होते. त्याचवेळी चोरट्याने त्यांची पत्नी वृषाली यांच्या जवळील पर्स हिसकावून पळ काढला. तसेच बोन्द्रे यांच्या जवळील महत्वाच्या कागदपत्रांची फाईलदेखील पळवली. बोन्द्रे यांनी चोरट्याचा पाठलाग करुन पर्स मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा पळ काढण्याच यशस्वी झाला. बोन्द्रे यांच्या पत्नीच्या पर्समध्ये 26 हजारांची रोकड, एटीएम कार्डसह इतरही साहित्य होते. त्याची तक्रार त्यांनी आधी मुंबई येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात केली होती. मात्र चोरीची घटना कल्याण स्थानकात घडल्याने तो गुन्हा पोलिसांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. त्यानुसार गुन्ह्याचा शोध घेतला असता चोराला अटक केली असून मुद्देमाल हस्तगत केला असल्याचेही बारटक्के म्हणाले. 

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रेArrestअटकThiefचोर