शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

रत्नागिरीतील थिबा राजवाडा झाला पर्यटकांसाठी खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:07 IST

रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते.

रत्नागिरी : शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. या राजवाड्याची पहिल्या दोन टप्प्यांतील कामे पूर्ण करून राजवाडा आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे चार वर्षांनंतर पर्यटकांना हा राजवाडा आतून पाहता येणार आहे.थिबा राजवाडा हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी मार्च, २०११ मध्ये निधी मंजूर झाला. मात्र, हा निधी मुदतपूर्व खर्च न झाल्याने पुन्हा शासन दरबारी जमा झाला होता. त्यानंतर, थिबा राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी जानेवारी, २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडून पाठविण्यात आला होता. त्या वेळी पुरातत्त्व विभागाने आर्थिक वर्षात निधी खर्च करण्याची अट शिथिल करून घेतली होती.राजवाड्याचे पुरातन सौंदर्य अबाधित ठेवून डागडुजी करण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक पुरातत्त्व विभागातर्फे पाठविण्यात आले होते. तीन वर्षांनंतर या प्रस्तावाला (२०१४-१५)मध्ये मान्यता मिळाली होती.या राजवाड्यात थिबा राजाचे विश्रांतीगृह, कपडे आणि थिबाने वापरलेल्या काही गोष्टी आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. दरबार हॉलसह जवळपास १८ दालने या राजवाड्यात आहेत. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्ट्या लावलेल्या असून, अर्धवर्तुळाकार खिडक्यांना रंगीबेरंगी इटालियन काचा लावलेल्या आहेत.ब्रह्मदेशच्या राष्ट्राध्यक्षांची भेटब्रह्मदेश राजघराण्यातील काही वंशज व राष्ट्राध्यक्षांनी पाच वर्षांपूर्वी रत्नागिरीत येऊन थिबा राजवाड्याची पाहणी केली होती. त्यावेळी थिबाच्या समाधीचेही त्यांनी दर्शन घेतले होते. राजवाड्याची परिस्थिती पाहून त्यांनी दुरुस्तीसाठी निधी देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शासनातर्फे दुरुस्ती सुरू असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

टॅग्स :Thiba Palaceथिबा पॅलेसRatnagiriरत्नागिरी