‘त्यांना’ पाणी पाजणारच!

By Admin | Updated: February 10, 2017 01:33 IST2017-02-10T01:33:57+5:302017-02-10T01:33:57+5:30

म्हसावद (ता.जळगाव) येथील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठसका लागला. त्यावर बोलताना, सध्या मी किती पाणी पितो

'They' will drink water! | ‘त्यांना’ पाणी पाजणारच!

‘त्यांना’ पाणी पाजणारच!

जळगाव : म्हसावद (ता.जळगाव) येथील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठसका लागला. त्यावर बोलताना, सध्या मी किती पाणी पितो, याकडे अनेकांचे लक्ष असते, पण मी त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्र्यांचा रोख अर्थातच शिवसेनेवर असल्याने उपस्थितांनीही टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.
जळगाव जिल्ह्यातील म्हसावद-बोरनार गटातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या टिकेला मुख्यमंत्री उत्तर देतील, तसेच सेनेच्या मंत्र्यांनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर घेतलेल्या भेटीबाबत बोलतील, अशी अपेक्षा होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणे टाळले.
राज्य शासन २०१९ पर्यंत सर्व
गरिबांना हक्काची घरे देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सभेनंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना विमानात सोबत घेऊन मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले. त्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'They' will drink water!