पळत पळत त्यांनी बांधली लग्नाची गाठ
By Admin | Updated: February 3, 2017 15:33 IST2017-02-03T15:26:31+5:302017-02-03T15:33:07+5:30
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. धुमधडाक्यात, आगळ्या-वेगळ्या पद्धतीने लग्न करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.

पळत पळत त्यांनी बांधली लग्नाची गाठ
ऑनलाईन लोकमत
मेढा (सातारा), दि. 3 - विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. धुमधडाक्यात, आगळ्या-वेगळ्या पद्धतीने लग्न करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे दोन्ही बाजूंच्या कुटुंबाकडून परवानगी मिळल्यानंतर विवाह होणे म्हणजे दुग्धशर्करा योग. म्हणजे हल्ली पळून वगैर जाऊन लग्न करणे बरीच जोडपी शक्यतो टाळतात. मात्र साता-यात एक जोडप्याने चक्क पळता-पळताच लग्नगाठ बांधली.
म्हणजे घरातून पळ काढून नाही... नवरा-नवरी आणि व-हाडी मंडळी सर्व जण तब्बल 21 किलोमीटर धावले आणि त्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न केले.
जावळी तालुक्यातील मेढा काळोशी येथील नवनाथ डिगे आणि पूनम चिकण हे नवदाम्पत्याने अशा अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा थाटून लग्नबंधनात अडकले.