बॅरेज धरणपात्रात दोघे बुडाले

By Admin | Updated: October 8, 2016 04:23 IST2016-10-08T04:23:21+5:302016-10-08T04:23:21+5:30

बदलापूर येथील बॅरेज धरणाच्या परिसरात पिकनिकसाठी आलेले दोघे जण बुडाले आहेत.

They drowned in the barrage masonry | बॅरेज धरणपात्रात दोघे बुडाले

बॅरेज धरणपात्रात दोघे बुडाले


बदलापूर : बदलापूर येथील बॅरेज धरणाच्या परिसरात पिकनिकसाठी आलेले दोघे जण बुडाले आहेत. या दोघांचा अद्याप शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाचे जवान त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते.
डोंबिवली आणि दिवा येथून १२ तरुणांचा एक ग्रुप शुक्रवारी सकाळी पिकनिकसाठी बॅरेज धरण परिसरात आला होता. हे सर्व जण पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील कल्पेश जाधव आणि सौरभ सिगनर या दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते बुडाले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्या मित्रांनी केला.
मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आले. हे दोघेही डोंबिवलीच्या सेंट मेरी हायस्कूलमधील अकरावीचे विद्यार्थी आहेत. यासंबंधीची माहिती बदलापूर अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता. (प्रतिनिधी)

Web Title: They drowned in the barrage masonry