शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांना' नियुक्त्या करण्याचा अधिकारच नाही, आव्हाडांनी पक्षाच्या घटनेतील अध्यक्षाचे अधिकारच वाचून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 19:30 IST

आव्हाड म्हणाले, पक्षाध्यक्षांपासून लपवून ते 9 आमदारांना पक्ष विरोधी करवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने, भारतीय सविधानातून निर्माण झालेल्या पक्ष संविधानाच्या कायद्यांवये, त्यांना हा अधिकार राहिलेला नाही. त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने काही वेळापूर्वी पत्रकार परिषदत घेऊन काही नेत्यांच्या नवनियुकत्या केल्या. यात जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून सुट्टी करत, सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. याची घोषणा पक्षाचे कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुक्ल पटेल यांनी केली. यानंतर लगेचच शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटाला, अशा पद्धतीने नियुकत्या करण्याचा अधिकारच नाही, असे म्हटले आहे.

आव्हाड म्हणाले, "काही मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली, असे आम्ही टीव्हीवर पाहिले. त्या पत्रकार परिषदेत अनेक पदे वाटण्यात आली. पण त्याना कायदेशीर संवैधानिक मान्यता होती का? असा प्रश्न आपण विचारला असता तर, याचे उत्तर काय मिळाले असते? त्यांना, अशा नियुक्त्या करण्याची संविधानिक आणि कायदेशीर मान्यताच नाही. कारण, पक्षाच्या घटनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत," असे म्हणत, जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या घटनेत पक्षाच्या अध्यक्षांना असलेले अधिकारच वाचून दाखवले.

तुम्हाला कुठल्याही नेमणुका करण्याचा कायदेशीर अधिकर नाही -यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निलंबनाचे कालचे पत्र दाखवत, "तुम्हाला पक्षातून निलंबित केले असताना, कायदेशीर रित्या तुम्हाला नेमनुका करण्याचा अधिकारच नाही. तुम्ही (प्रफुल्ल पटेल) जरी कार्यकारी अध्यक्ष असलात, तरी तुम्हाला कुठल्याही नेमणुका करण्याचा कायदेशीर अधिकर नाही," असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.  आव्हाड म्हणाले, पक्षाध्यक्षांपासून लपवून ते 9 आमदारांना पक्ष विरोधी करवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने, भारतीय सविधानातून निर्माण झालेल्या पक्ष संविधानाच्या कायद्यांवये, त्यांना हा अधिकार राहिलेला नाही. त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. तसेच, जयंत पाटील यांची निवड शरद पवार यांनी पक्षाच्या संविधानाप्रमाणे केलेली नियुक्ती आहे. त्यामुळे तुम्ही क्रॉस खेळू शकत नाही," असेही आव्हाड यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारprafull patelप्रफुल्ल पटेलAjit Pawarअजित पवार