शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मास्कसह अत्यावश्यक वस्तूंचे दरपत्रक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 05:32 IST

राजेश टोपे यांची माहिती; समिती स्थापन

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या लढ्यात सगळ्यात महत्त्वाचे अस्त्र असणाऱ्या मास्क आणि सॅनेटायझरच्या किमती किती असाव्यात याविषयीचा निर्णय तीन सदस्यीय समितीने येत्या दोन ते तीन दिवसात घ्यावा, असे आदेश दिले आहेत. तसेच कोरोनावरील उपचारासाठी लागणारी औषधे, साहित्याचे दरकरार करण्याचे आदेशही दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’ला दिली.विधी व न्याय विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार मास्कच्या किमतीवर तातडीने नियंत्रण आणावे, अशी शिफारस अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे.या शिफारशीची फाईल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे गेल्या गुरुवारपासून पडून असल्याचे समजते. याबाबत विचारले असता टोपे म्हणाले, मी आजच त्या फाईलवर स्पष्ट सूचना देऊन फाईल अन्न व औषधी विभागाकडे पाठवली आहे. डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली असून त्यात हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख, एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे यांचा समावेश आहे. त्या समितीने तातडीने दर निश्चिती कशी असावी हे स्पष्ट करावे अशा सूचना देण्यात आली आहे.सरकारला अधिकारएफडीए मंत्री शिंगणे यांच्या आदेशानंतर विभागाचे आयुक्त उन्हाळे यांनी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना मास्क आणि सॅनीटायझर या दोन्ही वस्तूंना ‘अत्यावश्यक वस्तू व सेवा कायदा’ लागू करावा तसेच यांच्या किंमतीवर कॅप आणावी असे पत्र पाठवले आहे.याबद्दल एफडीएचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, विक्रीसाठी दिल्या जाणाºया मास्कचा दर्जा ठरवण्याचे काम एफडीएनेच केले पाहिजे. दर्जानुसार किंमतही त्यांनीच ठरवून दिली पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅॅक्टचे चेअरमन मुख्य सचिव असतात. त्यांना अधिकार नसले तरीही अपवादात्मक परिस्थितीत त्यांनी विशेष अधिकार वापरुन या दोन्ही गोष्टी करणे सहज शक्य आहे.व्हॉल्व मास्कवर बंदी हवीव्हॉल्व असणारा मास्क हवा आतमध्ये फिल्टर करुन घेत असला तरी बाहेर सोडणारी हवा तो विषाणूसह बाहेर सोडतो, त्यामुळे त्याचे उत्पादन आणि विक्री तातडीने एफडीएने बंद करावी असेही महेश झगडे यांनी सांगितले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस