शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत भारनियमन होणार नाही, वीजनिर्मिती कमी झाल्यामुळे तात्पुरते भारनियमन - ऊर्जामंत्री बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 20:11 IST

महानिर्मिती  आणि खाजगी वीज निर्मिती कंपन्यांची वीज निर्मिती कमी झाल्यामुळे राज्यात भारनियमनाचे तात्पुरते संकट निर्माण निर्माण झाले आहे. मात्र येत्या 15 दिवसांत विजेची परिस्थिती सुधारेल. दिवाळीत भारनियमन होणार नाही.

नागपूर -  महानिर्मिती  आणि खाजगी वीज निर्मिती कंपन्यांची वीज निर्मिती कमी झाल्यामुळे राज्यात भारनियमनाचे तात्पुरते संकट निर्माण निर्माण झाले आहे. तसेच एससीसीएल कोळसा खाणीत पडलेल्या पावसामुळे कोळसा उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी कमी कोळसा उपलब्ध झाल्यामुळे भारनियमन करावे लागत आहे, मात्र येत्या 15 दिवसांत विजेची परिस्थिती सुधारेल. दिवाळीत भारनियमन होणार नाही,  असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगितले.

  ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, "मुंबईची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत असून,  मुंबईत भारनियमन होणार नाही. तसेच महानगरांमध्येही भारनियमन होणार नाही. टाटा पॉवरकडून सध्या 850 मेगावॉट, जलविद्युतद्वारे 410 मेगावॉट, डहाणूकडून 240 मेगावॉट, व्हीआयपीएल 310 मेगावॉट, लघुकालिन निविदा व एक्स्चेंजच्या माध्यमातून 1530 मेगावॉट वीज मिळत आहे. महानिर्मितीकडून औष्णिक व वायू प्रकल्पातून 4980 मेगावॉट, कोयना जलविद्युत प्रक़ल्पातून 1360 मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पातून 4100 मेगावॉट वीज मिळत आहे. खुल्या बाजारातही वीज उपलब्ध नाही. खाजगी वीज प्रकल्प अदानीकडून 1750 मेगावॉट, रतन इंडियाकडून 380 मेगावॉट, सीजीपीएलकडून 560 मेगावॉट व सौर, पवनऊर्जा, एमको, जिंदाल यांच्याकडून 200 मेगावॉट वीज मिळत आहे."विजेच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.  "सध्या अंदाजे 2000 मेगावॉटची तूट निर्माण झाली आहे. तूर्तास पवनऊर्जा, अणुऊर्जा व जलविद्युत प्रकल्प बंद आहेत. त्यामुळेच वीज तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे. ही स्थिती 15 दिवसांत सुधारणार आहे. त्यामुळे सध्याचे भारनियमन हे तात्पुरत्या स्वरूपातील आहे. विजेची मागणी असताना विजेचा तुटवडा पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी आपण आपल्या राज्याची मागणी पूर्ण करून उत्तर प्रदेशला वीज दिली आहे. तसेच 30 मार्च 2017 ला सुमारे 24 हजार मेगावॉट विजेचे यशस्वी वितरण आणि पारेषण आपण केले आहे," याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

"वेस्टर्न कोल फिल्डसने कोळसा पुरवठा वाढवला आहे. खाणीमध्ये झालेल्या पावसामुळे एसईसीएलचा कोळसा पुरवठा कमी झाला. महानिर्मितीची 10 हजार मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता आहे. पण 7 हजार मेगावॉट वीज महावितरणला द्यावी लागते. सी गटात सध्या भारनियमन सुरु आहे. पण लवकरच तेही भारनियमन संपणार आहे. ज्या गटात वीजचोरी आणि वीज वहनाचा तोटा तसेच वीजबिल वसुली कमी आहे, तेथे भारनियमन राहणार आहे. भारनियमनाची संकट लक्षात घेता वीज नियामक आयोगाने नुकतीच 1200 मेगावॉट वीज खुल्या बाजारातून घेण्यास परवानगी दिली, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार