शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरला ट्रॅक्टरनं करणार मुंबई चक्काजाम?; पोलीस अलर्ट

By प्रविण मरगळे | Updated: December 21, 2023 11:21 IST

मुंबई तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अलर्ट झाले आहे.

मुंबई - Maratha Reservation Update ( Marathi News ) जालना येथील अंतरवाली सराटी इथं उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटवला. येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी गेल्या २ महिन्यापासून जरांगे राज्यभरात दौरा करत सरकारला इशारा देत आहे. त्यातच विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊन असं सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणावर ठोस निर्णय होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यातच आता राज्यभरातून मराठा आंदोलक २४ तारखेला मुंबईत ट्रॅक्टरनं आणून चक्का जाम करणार असल्याची माहिती हाती लागली आहे. 

राज्याच्या गृहखात्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राज्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबरला मुंबई येथे कार्यकर्त्यांचा जमाव होण्याची शक्यता आहे. त्यात हा जमाव जमवण्यासाठी राज्यातून विविध भागातून ट्रॅक्टरही वाहने मुंबई आणली जाणार आहेत. विविध भागातून मुंबई ट्रॅक्टर आणल्यास मुंबईच्या वाहतुकीचा मोठा फटका बसणार असून त्यातून लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. त्याचसोबत लोकांची गर्दी जमून जाळपोळ, गाड्या फोडणे, रस्ता अडवणे, टायर जाळणे असे प्रकार करून शांतता भंग केली जाण्याची शक्यता असल्याचं पोलिसांना कळाले आहे. 

त्यामुळे मुंबई तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अलर्ट झाले आहे. पोलिसांनी राज्यभरात अनेक ट्रॅक्टर मालकांना १४९ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत म्हटलंय की, आपल्याकडे असलेले ट्रॅक्टर शेतीच्या उपयुक्त कामासाठी घेतलेले आहेत. त्याचा वापर शेतीसाठीच करावा. आपल्याकडे कुणीही मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते, नागरीक ट्रॅक्टरच्या मागणीसाठी आल्यास त्यांना ट्रॅक्टर देऊ नये आणि स्वत:ही ट्रॅक्टरसोबत घेऊन जावू नये. आपण त्यांना ट्रॅक्टर पुरवल्यास किंवा घेऊन गेल्यास आरक्षण संबंधाने गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्याचसोबत कुठलीही शांतता भंग करणारी घटना घडल्यास आपल्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून सदर ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल अशी खबरदारीची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPoliceपोलिस