राज्यातील ३२ पोलीस अधिकारी बदलले

By Admin | Updated: June 9, 2016 08:05 IST2016-06-09T07:12:30+5:302016-06-09T08:05:29+5:30

राज्यातील ३२ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा गृहविभागाकडून देण्यात आले.

There were 32 police officers in the state | राज्यातील ३२ पोलीस अधिकारी बदलले

राज्यातील ३२ पोलीस अधिकारी बदलले


मुंबई : राज्यातील ३२ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा गृहविभागाकडून देण्यात आले. मुंबई आयुक्तालयातील प्रवक्ते संग्रामसिंह निशानदार यांच्यासह तीन उपायुक्तांची अन्यत्र बदली करण्यात आली असून, सहा जणांची आयुक्तालयांतर्गत नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गामध्ये चार महिन्यांपूर्वी मोटार वाहतूकदारांच्या आंदोलनावेळी सेना व कॉँग्रेस आमदारावर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे चर्चेत आलेले सिंधुदुर्गचे अधीक्षक दत्ता शिंदे यांची सांगलीच्या पोलीसप्रमुख पदी बदली करण्यात आलीय.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याबाबत चर्चा झाल्यानंतर, शिंदे यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या जागी सांगलीचे सुनील फुलारी यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाण, चार सहायक आयुक्त/उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी
संदीप पाटील (गडचिरोलीहून सातार्‍याला), अभिनव देशमुख (सातार्‍याहून गडचिरोलीला), जी. श्रीधर (नियुक्तीच्या प्रतीक्षेत- नागपूर शहर), सचिन पाटील (विशेष शाखा बदली आदेशाधीन- मुंबई), सुरेश मेंगडे (भंडारा बदली आदेशाधीन- पीसीआर ठाणे), अमोल तांबे (एसआरपी, गट क्र.१ पुणेमधून महामार्ग सुरक्षा, पुणे), मनोज पाटील (ठाणे परिमंडळ ५ बदली आदेशाधीन- ठाणे परिमंडळ-२), एन. अंबिका (मुंबई परिमंडळ- १0 बदली आदेशाधीन- परिमंडळ ४), ज्ञानेश्‍वर चव्हाण (एसआरपी गट क्र. ८ मुंबईमधून विशेष शाखा, मुंबईत), राजेंद्र दाभाडे (नाशिक शहरमधून मुंबईत), आर. रामासामी (अहमदनगर बदली आदेशाधीन- अप्पर अधीक्षक आहेरी), संग्रामसिंग निशानदार (मुंबईहून एसीबी, ठाणे), दत्तात्रेय कराळे (एसीबी ठाणेहून नाशिक शहर), शशीकुमार मिश्रा (प्रतीक्षेत-अमरावती शहर), मोरेश्‍वर अत्राम (पीसीआर बदली आदेशाधीन अमरावती परिमंडळ- २), सुनील कडासने ( प्रतीक्षेत- राज्य गुप्त वार्ता), राकेश कलासागर (प्रतीक्षेत- नागपूर शहर), लक्ष्मीकांत पाटील (मुंबई-नाशिक शहर), अविनाश अंबुरे (सहायक पोलीस महानिरीक्षक अस्थापना- सहायक महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था, पोलीस मुख्यालय), संजय पाटील (विशेष शाखा २ - मुंबई परिमंडळ - ३), पी.पी.शेवाळे (बदली आदेशाधीन-राज्य गुप्तवार्ता विभाग), एस.डी.कोकाटे (मंत्रालय सुरक्षा बदली आदेशाधीन - सहायक महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), शीला साईल (मुंबई - अप्पर महासंचालक विशेष अभियान), सुनील बाबर (पीसीआर मुंबई आदेशाधीन - मुख्यालय कार्यालय नियंत्रण कक्ष), अंकुश शिंदे (मुंबई-नाशिक ग्रामीण), संजय मोहिते (नाशिक ग्रामीण - मुंबई), राजीव जैन (रेल्वे नागपूर- एसआरपीएफ गट क्र, ११ नवी मुंबई), संजय ऐनपुरे (एसआरपी- ३, जालना गट क्र. ३-नांदेड), महेश घुर्ये (एसआरपी, ११ नवी मुंबई-पीसीआर, नाशिक) व रवींद्र परदेशी (प्रतीक्षेत-नागपूर शहर). (प्रतिनिधी) उपायुक्त सचिन पाटील, संजय मोहिते, एन. अंबिका, ज्ञानेश्‍वर चव्हाण, राजेंद्र दाभाडे व संजय पाटील यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे, तर संग्रामसिंह निशानदार, शीला साईल व लक्ष्मीकांत पाटील यांची मुंबईतून अन्यत्र बदली करण्यात आली आहे. गडचिरोली येथून सातार्‍याच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झालेले संदीप पाटील यांना नक्षलग्रस्त भागात बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'लोकमत'तर्फे एप्रिलमध्ये 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सहायक आयुक्त/ उपअधीक्षक : शिवाजी पवार ( गडचिरोली-पुणे शहर), रमेश धुमाळ (गडचिरोली-ठाणे शहर), बाजीराव मोहिते ( एसआयडी आदेशाधीन- औरंगाबाद ग्रामीण), सुहास बच्छावे (मीरा रोड- सांगली), केशव पातोंड (चाळीसगाव-पाचोरा, जळगाव)

Web Title: There were 32 police officers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.