गं पोरीऽऽ गवर आली!
By Admin | Updated: September 9, 2016 10:44 IST2016-09-09T10:44:47+5:302016-09-09T10:44:47+5:30
गणपतीपाठोपाठ गुरुवारी गौराईचे माहेरी मोठय़ा उत्साहात आगमन झाले.

गं पोरीऽऽ गवर आली!
- राहुल वाडेकर, ऑनलाइन लोकमत
विक्रमगड (पालघर), दि. ९ - गणपतीपाठोपाठ गुरुवारी गौराईचे माहेरी मोठय़ा उत्साहात आगमन झाले. गौराईला नटवणे, सजवणे, तिचे आगमन साजरे करणे, याचा सोहळाही सर्वत्र साजरा झाला. विविध ज्ञातींमध्ये गौरीच्या पूजनाच्या पद्धती वेगळ्या आहेत. तिच्या सजवण्यातही पारंपरिक पद्धती आहेत. नैवेद्यातही खासियत आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात कोळी, आगरी, कुणबी, आदिवासी या मूळ जमाती आपले संस्कृतीचे वेगळेपण जपून आहेत. मात्र, या सर्व परंपरा वेगळ्या जरी असल्या तरी त्यातील श्रद्धाभाव सारखाच असतो. एकंदरीतच माहेरवाशिणीचे स्वागत जिल्हाभरात मोठय़ा उत्साहात झाले.
आज या गौराईला घरोघरी १६ भाजांचा नैवेदय दाखविला जाणार आहे दरम्यान सर्वत्र गौराईचे जल्लोशात स्वागत करण्यात आले.