शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर अहवालात ठपका नव्हता

By admin | Updated: February 16, 2017 04:55 IST

शिवसेनेने नंदलाल समितीच्या अहवालाचा आधार घेत मुख्यमंत्री व नागपूरचे तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असले

यदु जोशी / मुंबईशिवसेनेने नंदलाल समितीच्या अहवालाचा आधार घेत मुख्यमंत्री व नागपूरचे तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असले तरी, आपल्या अहवालात फडणवीस यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नव्हता, असे नंदलाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, नागपूर महापालिकेतील घोटाळा झाल्याचा अहवाल आपण दिल्याचेही ते म्हणाले.नंदलाल सध्या वाराणसीमध्ये आहेत. मोबाइलवर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला नागपूर महापालिकेतील घोटाळ्यांची चौकशी करण्यास सांगितले होते. मी त्यासाठी सुरुवातीला तयार नव्हतो. मला वादात कशाला पाडता, असे मी म्हटले होते. पण आपण निष्पक्ष चौकशी कराल आणि आपल्याबाबत एक विश्वासार्हतादेखील आहे, असे विलासरावांनी मला सांगितले होते. नंदलाल म्हणाले की, फडणवीस यांनी वैयक्तिक कोणताही भ्रष्टाचार केल्याचे मला चौकशीमध्ये आढळले नाही. त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात महापालिका सभागृहाच्या बैठकी नियमित झाल्या नाहीत, असा निष्कर्ष मात्र मी नोंदविला होता. आता त्या चौकशीला बरीच वर्षे झाली, पण साधारणत: १४-१५ मुद्द्यांवर मी त्या वेळी चौकशी केली होती. प्रकर्षाने आठवतो तो क्रीडा साहित्य घोटाळा. आपापल्या वॉर्डात क्रीडा साहित्याचे वाटप करण्यासाठी नगरसेवकांना विशेष निधी दिला जायचा. अनेक नगरसेवकांनी पैशांची उचल केली पण साहित्य वाटलेच नाही. खोटी बिले सादर करून पैसा मात्र घेतला, असे चौकशीत आढळले होते. औषधी खरेदीमध्येही तसेच झाले होते. त्या प्रकरणात भाजपासह विविध पक्षांच्या नगरसेवकांना अटक झाली होती. अशा पद्धतीने खरेदीची पद्धत महापालिकेत त्यापूर्वीदेखील होती, असे नंदलाल म्हणाले.