शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी गुंतवणूकीसाठी देशात पोषक वातावरण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 18:53 IST

आपल्याकडील नोकरशाही आणि व्यावसायिक धोरणे सुधारायला हवीत..

ठळक मुद्देनोकरशाहीसह देशाच्या व्यापार धोरणांतही आमूलाग्र बदल करावे लागणार

पुणे : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याची घोषणा करुन चालणार नाही. तर, परदेशी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहीजे. परवान्यासाठी लागणारा कालावधी, पायाभूत सुविधांची वाणवा आणि कामगार, माथाडी संघटनांकडून होणारी दमबाजी अशा वातावरणात परदेशी गुंतवणूक येणार नाही. त्यासाठी नोकरशाहीसह देशाच्या व्यापार धोरणांतही आमूलाग्र बदल करावे लागतील, असे स्पष्ट मत इंडिया अरब कंट्रीज चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर’चे अध्यक्ष अनिरबान सरकार यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.  पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘अरब देशांमधे युवा उद्योजकांना असलेली व्यापार संधी’ या विषयावर सरकार बोलत होते. ‘अरब देशांमधे अनेक व्यापार संधी आहेत. कृषी क्षेत्रात तर अनेक संधी आहेत. तेथे खजूर आणि काही मेव्याचे पदार्थ सोडल्यास फारशा शेतमालाचे उत्पादन होत नाही. आपल्याकडे शेतमाल सडला तरी, त्याला जहाजावर चढवायची परवानगी मिळत नाही. तीच स्थिती देशातील उद्योगांबाबतही लागू होते. विविध परवाने मिळविण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जातो. या प्रक्रियेतून गेल्यानंतर कामगार-माथाडी संघटना दारात उभे राहतात. अमूक काम आम्हालाच मिळाले पाहीजे, अशी मागणी करतात. माथाडी कामगारांनी गाडी खाली करो अथवा न करो त्यांना पैसे द्यावे लागतात. रस्ते, वीज आणि पाण्याची देखील पुरेशी सोय नाही. अशा वातावरणात परदेशी गुंतवणुक कशी येईल, असा प्रश्न सरकार यांनी उपस्थित केला. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याची सरकारने घोषणा केली आहे. आपल्यापेक्षा पुढारलेली अर्थव्यवस्था असणाऱ्या देशात कामाची रचना कशी आहे, हे आपण पाहत नाही. माणूस नाही तर, कामाची प्रणाली ही खऱ्या अर्थाने काम करीत असते. अमेरिका, चीन या देशांनी आपल्या कामाची रचना सुधारलेली आहे. आपल्याकडील नोकरशाही आणि व्यावसायिक धोरणे सुधारायला हवीत, असे सरकार म्हणाले. ---------------------

मराठी माणूस बाहेर पडत नाही...दिल्लीचा माणूस रोजगारासाठी वाट्टेल तिथे जाईल. मात्र, मराठी माणसाला आपले घर प्रिय असते. त्यांची बाहेर जायची मानसिकताच नाही. पुणे सोडून मला दुसरीकडे जायचे नाही, असे अनेक जण मुलाखतीत सांगतात. आयुष्यामधे प्रगती करायची असल्यास बाहेर पडायलाच हवे, असे अनिरबान सरकार म्हणाले. -------

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसाय