पाच वर्षांत उद्यानातील खेळणी खरेदीची नोंदच नाही

By Admin | Updated: May 16, 2014 03:25 IST2014-05-16T03:25:24+5:302014-05-16T03:25:24+5:30

महापालिकेच्या उद्यान विभागात लाखोंच्या व्यवहाराची योग्य नोंदच न आढळल्याने लेखापरिक्षकांनीच त्याला आक्षेप घेतला आहे.

There is no shopping record in five years | पाच वर्षांत उद्यानातील खेळणी खरेदीची नोंदच नाही

पाच वर्षांत उद्यानातील खेळणी खरेदीची नोंदच नाही

जितेंद्र कालेकर, ठाणे - महापालिकेच्या उद्यान विभागात लाखोंच्या व्यवहाराची योग्य नोंदच न आढळल्याने लेखापरिक्षकांनीच त्याला आक्षेप घेतला आहे. ठामपाच्या हरित प्रकल्पांतर्गतही अनेक बाबींचे उल्लंघन झाले आहे. गेल्या पाच वर्षात कोणत्या उद्यानात कोणती खेळणी होती, ती किती दिवस टिकली? त्यांच्या दुरुस्तीवर किती खर्च झाला?, नवीन घेण्यासाठी किती खर्च झाला?, ती कुठे बसविली?, जुनी खेळणी भंगारात विकतांना कोणती पद्धत वापरली, त्याच्या विक्रीतून किती पैसे मिळाले? याचा कोणताच तपशील नसल्याने लेखा परिक्षण विभागाने उद्यानातील खेळणी तसेच साहित्याची नोंद साठा नोंदवहीला घेऊन त्याप्रमाणे पालन करण्याचा शेरा मारला आहे, या संपूर्ण अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जनमोर्चाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेने हरित ठाणे प्रकल्पांतर्गत पहिल्या दीड वर्षात हिरवळ आणि वृक्ष लावणी करायची असून पुढील साडेतीन वर्षे त्याची निगा आणि देखभाल करावयाची आहे. याचे उल्लंघन याठिकाणी झालेले आहे. उद्यानांमध्ये गेल्या पाच वर्षात कोणत्या उद्यानात कोणती खेळणी होती. कोणती नविन खेळणी बसविली, याची नोंद नाही.

Web Title: There is no shopping record in five years