शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या आधारे आरक्षण नाहीच-तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 06:41 IST

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत काही काळ गदारोळ झाला.

मुंबई : मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत काही काळ गदारोळ झाला. मुस्लिम आरक्षणाची आग्रही मागणी विरोधकांनी केली. तर, मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गाला आजही आरक्षण आहे. मग धर्माच्या आधारावर आरक्षण हवेच कशाला, असा सवाल अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना केला.मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मांडली. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. मात्र, राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सत्तेत असताना काँग्रेसने मुस्लिमांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर, ओवेसी हे तुमचे सगळे ‘वंचित’ घेऊन गेले. काँग्रेस मतांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरून भरकटल्याचा आरोपही तावडे यांनी केला.मुस्लिम समाजाला मुस्लिम शैक्षणिक संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळते. तसेच मुस्लिम समाजातील आरक्षित पोटजातींना आरक्षणाचा लाभ मिळत असल्याच्या तावडे यांच्या दाव्यावर शरद रणपिसे यांनी आक्षेप घेतला. मंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप केल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. तालिका सभापती हुस्नबानो खलिफे यांनी पाच मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले होते.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षणVinod Tawdeविनोद तावडे