मुख्यमंत्री बदलासाठी राष्ट्रवादीचा दबाव नाही
By Admin | Updated: June 23, 2014 04:09 IST2014-06-23T04:09:20+5:302014-06-23T04:09:20+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी असली तरी, मुख्यमंत्री बदल हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बदलासाठी राष्ट्रवादीचा कोणताही दबाव नाही

मुख्यमंत्री बदलासाठी राष्ट्रवादीचा दबाव नाही
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी असली तरी, मुख्यमंत्री बदल हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बदलासाठी राष्ट्रवादीचा कोणताही दबाव नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष़्ट केली.
लोकसभा निवडणुकीमध्ये पानीपत झाल्यानंतर महाराष्ट्रात नेतृत्वबदल करण्यासाठी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींवरील वाढता दबाव अणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षश्रेठींकडे व्यक्त केलेली कथित नाराजी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून चव्हाण यांच्या बदलासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. याबाबत पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठांना भेटले असतील तर ते त्यांचा निर्णय घेतील. तो त्यांचा अधिकार आहे. त्याबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. मुख्यमंत्र्याबाबत आमची कोणतीही तक्रार नाही ही केवळ चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दबाव टाकण्याचे कारणच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.