राष्ट्रवादीबाबत नकारात्मक नाही

By Admin | Updated: January 30, 2017 00:24 IST2017-01-30T00:24:27+5:302017-01-30T00:24:27+5:30

‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत मी नकारात्मक नाही.

There is no negative about NCP | राष्ट्रवादीबाबत नकारात्मक नाही

राष्ट्रवादीबाबत नकारात्मक नाही

कराड : ‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत मी नकारात्मक नाही. मी चर्चेला तयारच आहे, परंतु कऱ्हाड तालुक्यात कोणत्याही आघाडीबरोबर निवडणुकीत एकत्रित येणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
चव्हाण म्हणाले, ‘जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी समविचारी लोकांना बरोबर घ्यावेच लागणार आहे. त्यासाठी मी चर्चेला तयारच आहे. कऱ्हाड तालुक्यातील निवडणुकीची काँगे्रसची भूमिका येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.’ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते नाराज आहेत. याबाबत विचारताच, ‘मलाही बाहेरून असं समजतेय, पण नाराजीचे कारण काही कळत नाही. खरं तर त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. आम्ही नेहमीच त्यांचा सन्मान ठेवला आहे.’ 

Web Title: There is no negative about NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.