शपथ घेताना नाव नाही 'आठवले', पण सारं राष्ट्रपती भवन तर हसवले
By Admin | Updated: July 6, 2016 07:37 IST2016-07-05T22:02:41+5:302016-07-06T07:37:35+5:30
नेटिझनमध्ये त्यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आल्यानंतरच कविताचा सुळसुळाट झाला होता. अशातच त्यांच्यावर सोशल मीडियातून आलेल्या कविता आम्ही देत आहेत, त्या वाचून तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल.

शपथ घेताना नाव नाही 'आठवले', पण सारं राष्ट्रपती भवन तर हसवले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : रामदास आठवले सोशल मीडिया असो की, प्रिंट, इलेक्ट्रानिक आणि डिजिटल मीडिया या सर्वांमध्ये कायम चर्चेत असतात. त्यांच्या कविता तर जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय असतो, त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते त्यावेळी असो अथवा त्यांनी भाजपाशी युती केलेली असो. त्यांची चर्चा कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर होतेच होते.
आज तर त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले मग ती चर्चा जास्तच झाली, राज्यमंत्रिपदानंतर त्यांनी माध्यमांसमोर बोलताना स्वत:च कविता केली. नेटिझनमध्ये तर त्यांच नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आल्यानंतरच कवितांचा सुळसुळाट झाला होता. अशाच त्यांच्यावर सोशल मीडियातून आलेल्या कविता आम्ही देत आहेत, त्या वाचून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल.
मोदीका ढोकला,फडणवीसकी संत्री
अब भरपूर आयेगा पाऊस
मै जो बन गया मंत्री
मंत्री पदाची शपथ घेताना नाव नाही "आठवले"!
मंत्री झालो म्हणून काय झाले.
सारं राष्ट्रपती भवन तर हसवले !!
काल कवी म्हणाले
" मी मंत्री होणार हे मला कळले
म्हणून माझे पाय अमित शहांकडे वळले
कवी थेट राष्ट्रपती भवनातुन....
मुंबई के बारीश में लोकल ट्रेन घसर्या....
मंत्री पद की शपथ लेते वक्त में मेरा नाम विसर्या...
मंत्रीपद के आनंदसे में इतना फुल्या
मंत्रीपद के आनंदसे में इतना फुल्या
के खुद का नावच लेने को भुल्या......
मेरेको आज कूछ नही आठवले...
तो मेने फक्त gud morning पाठवले....
थंडी भी बहोत सुटी है,
आणि वारा भी बहोत सुटा है,
तुमको क्या सांगु...
इसलिए मै दुपारको उठा है.
बचपनमे था खोकला
तो मेरुकु औषध चाटवले.
बचपनमे था खोकला
तो मेरुकु औषध चाटवले.
आज फिर से आया खोकला
इसलिए मेरुकु फिरसे आठवले
जो मुझे वोट देंगा उसको
पिलाऊंगा मै बोर्न वीटा....
जो मुझे वोट देंगा उसको
पिलाऊंगा मै बोर्न वीटा....
जो मुझे वोट नहीं देंगा उसको
फेक के मारूंगा मै दगड-वीटा !!
आंघोळ के कारण आई से दररोज होता है तंटा,
म्हनती है वो गार पाणी लेता है तो भी ईतना टाइम लगाता है भामटा,
मै आईसे बोल्या आये मै क्या करू,
गार पाणी का पहला तांब्या आंगपे लेऊ की नको इसमेच जाताय मेरा १ घंटा
लोहा लोहे को कापता है
प्लास्टिक प्लास्टिक को कापता है...
वाह . . . वाह . . .
लोहा लोहे को कापता है
प्लास्टिक प्लास्टिक को कापता है...
वाह . . . वाह . . .
लेकिन...
माणुस हि एक ऐसा इंसान है
जो न्हावि के पास जाकर केस
कापता है.
मच्छी को खाता है बगळा
मच्छी को खाता है बगळा
फिर मेरेको मंत्रीपद से क्यों वगळा
पावसाळे मे ऊन पड्या....
ऊन्हाळे मे गारा....
अभी थंडी मे पड रहा है पाऊस....
देवा तुम्हारे काँप्यूटर का बिघड्या क्या माऊस?
- आपले सर्वांचे लाडके कवी !!
थंडे पाणी से मारा आँगन मै सडा...
थंडे पाणी से मारा आँगन मै सडा...
इसीलिए आज चांगल उन पड़ा.
आर्ची और परश्या का
प्रेम बघ के
मेरे आँखो मे पाणी आया घळा घळा घळा.......
आखिर में काटते है
दोनों का गळा
आपल्याला काय करायचय
डोंगराला आग लागली
पळा पळा पळा...