शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

राज्यात कोठेही चंद्रदर्शन नाही : रमजान पर्व येत्या शुक्रवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 8:54 PM

इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची बुधवारी २९ तारीख असल्याने, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात करण्यात येईल.

ठळक मुद्दे शुक्रवारपासून रमजानची सुरुवात ‘तरावीह’च्या विशेष नमाजपठणाला उद्या रात्रीपासून सर्व मशिदींमध्ये प्रारंभ राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोठेही चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही.

नाशिक : मुस्लीम समाजाच्या उपवासाचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्वाला येत्या शुक्रवारी संध्याकाळपासून प्रारंभ होणार आहे. बुधवारी (दि.१६) संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता होती;मात्र राज्यासह नाशिक शहरासह जिल्ह्यात कोठेही चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही राज्य चांद समिती व नाशिक विभागीय चांद समितीला प्राप्त होऊ शकली नाही.इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची बुधवारी २९ तारीख असल्याने, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात करण्यात येईल. गुरूवारी संध्याकाळी सुर्यास्तानंतर येणारी रात्र ही रमजान पर्वाची पहिली रात्र असणार आहे, त्यामुळे ‘तरावीह’च्या विशेष नमाजपठणाला उद्या रात्रीपासून सर्व मशिदींमध्ये प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी पहाटे मुस्लीम बांधव अल्पोहार घेत रमजान पर्वाची पहिली ‘सहेरी’ करुन उपवास (रोजा) करतील. सहेरीची समाप्तीची वेळ ४ वाजून ३३ मिनिट अशी आहे. नाशिकमधील शाही मशिदीत शहरातील विविध धर्मगुरुंच्या उपस्थितीत चांद समितीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत रमजान पर्वाबाबत अंतीम निर्णय धर्मगुरूंकडून घेण्यात आला.

जय्यत तयारीरमजान पर्वाच्या दृष्टीने मुस्लीम बांधवांकडून तयारी केली जात आहे. उपवासांचे नियोजन असलेलल्या वेळापत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. पहाटे अल्पोहार घेऊन निर्जळी उपवासाला प्रारंभ केला जातो. सूर्यास्तानंतर संध्याकाळी फलाहार करून मुस्लीम बांधव उपवास सोडतात. रमजान पर्वाचे तीस दिवस समाजबांधवांची दिनचर्या पूर्णपणे बदललेली पहावयास मिळते. धार्मिकदृष्ट्या रमजान पर्वाला विशेष महत्त्व असून, या महिन्यात समाजबांधवांकडून धार्मिक कार्यावर मोठा भर दिला जातो. यामुळे पहाटेपासून तर रात्रीपर्यंत मशिदींमध्ये वर्दळ पहावयास मिळते. मुस्लीम बांधव अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी देण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात. कुराणपठण, नमाजपठण, तस्बीहपठणावर नागरिकांचा भर असतो. तसेच रमजाच्या दुसऱ्या व तीसºया खंडात दानधर्माला प्राधान्य दिले जाते. कृपाखंड, मोक्षखंड व नरकापासून मुक्तीचा खंड अशा तीन खंडांमध्ये रमजान पर्वची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक खंड दहा दिवसांचा असतो, असे धर्मगुरू सांगतात.

टॅग्स :Muslimमुस्लीमIslamइस्लाम