‘मंत्रिपदाची भुरळ नाही; पण केंद्रात रस’

By Admin | Updated: November 24, 2014 03:27 IST2014-11-24T03:27:11+5:302014-11-24T03:27:11+5:30

आक्रमक कार्यकर्त्यांची फौज पाठीशी उभी राहिली त्यातून आपले नेतृत्व घडले. त्यामुळे आपल्याला मंत्रिपदाची भुरळ नसून ‘कार्यकर्ता’ हेच पद आपल्यासाठी मोठे

'There is no mood of ministers' But at the center, | ‘मंत्रिपदाची भुरळ नाही; पण केंद्रात रस’

‘मंत्रिपदाची भुरळ नाही; पण केंद्रात रस’

मुंबई/ पुणे : आक्रमक कार्यकर्त्यांची फौज पाठीशी उभी राहिली त्यातून आपले नेतृत्व घडले. त्यामुळे आपल्याला मंत्रिपदाची भुरळ नसून ‘कार्यकर्ता’ हेच पद आपल्यासाठी मोठे असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी केले. पण त्याचबरोबर राज्यात मंत्री होण्याची माझी इच्छा नसून, केंद्रातच रस आहे, भाजपाने मला केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
चेंबूरमध्ये रिपाइंच्या वाहतूक आघाडीतर्फे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह कलावंतांना ‘रिपब्लिकरत्न’ पुरस्काराचे वितरण रामदास आठवले यांच्या हस्ते झाले; या वेळी ते बोलते होते.
पुण्याच्या चिंचवडमधील वाल्हेकरवाडीत भगवान गौतमबुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना व रत्नसंभव बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला. त्यावेळी आठवले म्हणाले, राज्य मंत्रिमंडळ विस्तार हा शिवसेनेला सोबत घेऊनच होईल. शिवसेना सत्तेत सहभागी होईल, मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षालाही मंत्रिपद मिळेल. (प्रतिनिधी)

Web Title: 'There is no mood of ministers' But at the center,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.