राणेंना पक्षश्रेष्ठींची भेट नाहीच

By Admin | Updated: May 6, 2017 03:18 IST2017-05-06T03:18:35+5:302017-05-06T03:18:35+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना पक्षश्रेष्ठींनी बोलावून घेतले असल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात ते काँग्रेसचे सरचिटणीस

There is no meeting with Rana Pandharthrethi | राणेंना पक्षश्रेष्ठींची भेट नाहीच

राणेंना पक्षश्रेष्ठींची भेट नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना पक्षश्रेष्ठींनी बोलावून घेतले असल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात ते काँग्रेसचे सरचिटणीस अहमद पटेल यांच्या स्वीय सहाय्यकास भेटून परतले.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसमवेत राणेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमति शहा यांची भेट घेतली होती. मात्र, राणेंनी या भेटीचे वृत्त फेटाळले होते. मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारणारच ना, असे सांगत भाजपकडून आॅफर येते, मात्र त्यावर अजून विचार केलेला नाही, असा खुलासाही राणेंनी केला होता.
नारायण राणेंच्या मनधरणीसाठी अहमद पटेल यांनी राणेंना तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याची चर्चा होती. मात्र पटेल घरी नसल्याने त्यांच्या स्वीय सहाय्यकाशी बोलून राणे निघून गेले.

Web Title: There is no meeting with Rana Pandharthrethi