भाजपासोबत युती करण्याची घाई नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: November 2, 2014 17:50 IST2014-11-02T14:14:23+5:302014-11-02T17:50:25+5:30
युती करण्याची शिवसेनेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट करु असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केले आहे.

भाजपासोबत युती करण्याची घाई नाही - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २ - युती करण्याची शिवसेनेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट होईल असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टोलविरोधी आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरमधून झाल्याने राज्यातील नवीन सरकारने कोल्हापूरला टोलमुक्त करावे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. केंद्र सरकारने बेळगावचे बेळगावी असे नामकरण करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. यावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. बेळगावला केंद्रशासीत प्रदेश म्हणून जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.