मार्च परीक्षा अर्जाला विलंब शुल्क नाही
By Admin | Updated: November 26, 2014 01:44 IST2014-11-26T01:44:46+5:302014-11-26T01:44:46+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2क्15मध्ये घेण्यात येणा:या दहावीच्या परीक्षा अर्जासाठी विलंब शुल्क घेतले जाणार नाही.

मार्च परीक्षा अर्जाला विलंब शुल्क नाही
पुणो : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2क्15मध्ये घेण्यात येणा:या दहावीच्या परीक्षा अर्जासाठी विलंब शुल्क घेतले जाणार नाही. काही शाळांना परीक्षा अर्ज भरताना येणा:या तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
मार्च 2क्15मध्ये होणा:या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरून घेतले जात आहेत. प्रत्येक शाळेमध्ये विद्याथ्र्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपासून काही शाळांना परीक्षा अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर ही विलंब शुल्काने अर्ज भरण्याची मुदत आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे या कालावधीत अर्ज भरणा:यांकडून विलंब शुल्क घेतले जाणार नाही. त्यामुळे या मुदतीत भरलेले अर्ज नियमित समजले जातील. (प्रतिनिधी)