शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दहावी व बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 19:12 IST

इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या काही महिन्यांपुर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलं स्पष्ट.

पुुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या काही महिन्यांपुर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यानुसार दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची तर दि. १ ते २४ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मागील वर्षीचे वेळापत्रकाचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी मंडळाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे परीक्षांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मंडळाने दरवर्षीप्रमाणे मार्च २०१८ च्या परीक्षांचे वेळापत्रक काही महिन्यांपुर्वीच जाहीर केले आहे. सद्यस्थितीत त्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च, तर दहावीची दि. १ ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा दि. १ ते १७ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व कलचाचणी परीक्षा दि. १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावी स्टेनोग्राफी, दहावीची दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची परीक्षा तसेच इयत्ता बारावी व दहावीची आऊट आॅफ टर्न परीक्षा यांचा सविस्तर कालावधी छापील वेळापत्रकात देण्यात आलेला आहे. 

परीक्षेपुर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खासगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सव माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. छापील वेळापत्रकामध्ये बदल केला जाणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा