शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नौका दर्यात उतरल्याच नाही

By admin | Updated: August 2, 2016 03:07 IST

मच्छीमारांच्या जीवितास असणारा धोका पाहता पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी वरील एकही नौका सोमवारी समुद्रात उतरली नाही.

पालघर : समुद्रातील मासेमारीला जाण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने १ आॅगस्ट ला परवानगी दिली असली तरी समुद्र पूर्ण खवळलेला आणि वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने मच्छीमारांच्या जीवितास असणारा धोका पाहता पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी वरील एकही नौका सोमवारी समुद्रात उतरली नाही. त्यामुळे शासनाने समुद्रात मच्छिमारीसाठी दिलेली तारीख व कालावधी किती चुकीचा आहे हे निसर्गाने आज दाखवून दिले.महाराष्ट्र मासेमारी अधिनियम १९८१ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने १४ आॅगस्ट १९६६ मधील दुरु स्ती नुसार सागरी मासेमारी (पावसाळी बंदी) कालावधी १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पोर्णिमा या पैकी प्रथम येईल तो दिवस असा जाहीर केला होता. परंतु विधिवत सागराची पूजाअर्चा करीत नारळ अर्पण करूनच पारंपरिक मच्छीमार आपल्या नौका नारळी पोर्णिमे नंतरच समुद्रात पाठवीत होते.पावसाळी मासेमारी बंदी कालावधी काळात लहान जन्माला आलेल्या पिल्लांचे संवर्धन होऊन नद्या द्वारे मिळणाऱ्या खनिज द्रव्यामुळे प्लवंगाची वाढ होत मत्स्य खाद्य मुबलक प्रमाणात निर्माण होते. या काळात माशांची चांगली वाढ होत असल्याने मत्स्यसंपदा टिकून राहावी, याची दक्षता पारंपरिक मच्छीमार घेत आले होते. तसेच १ मे ते १५ मे दरम्यान स्वयंस्फूर्तिने आपली मासेमारी बंद करीत होते. अशा वेळी मत्स्यसंपदेत होणारी घट आणि अनेक माश्याच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत वाढ करने अपेक्षित असताना उलट ९२ दिवसाचा बंदी ६१ दिवसावर आणून ठेवला होता. या निर्णयामध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप मच्छिमार संघटना अनेक वर्षापासून करीत आहेत. या वर्षी पदुम विभागाच्या उपसचिवांनी १२ नॉटिकल समुद्राच्या बाहेरील क्षेत्राबाहेर पर्ससीननेट धारकांना आपल्या अधिकाराचे बाहेर जाऊन मासेमारी करण्याची परवानगी देऊन आरोपात तथ्य असल्याचे जणू दाखवूनच दिले आहे. (प्रतिनिधी)>वेधशाळेकडून धोक्याचा इशारासातपाटी, डहाणू, वसई, उत्तन बंदरातून माठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असून शासनाच्या आदेशान्वये १ आॅगस्ट पासून पावसाळी बंदी कालावधी संपून मासेमारीसाठी जाण्या साठी डिझेल, बर्फभरून काही नौका सज्ज झाल्या असताना समुद्रात ५५ ते ६० किलोमीटर प्रति तासाने वादळी वारे वाहून समुद्र खवळलेला राहणार असल्याचा इशारा वेध शाळेने दिल्याने सर्व नौका बंदरात थांबून आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने १ आॅगस्ट पासून मासेमारीसाठी दिलेली परवानगी ही अतिघाईची आणि चुकीची असल्याचे सोमवारी निसर्गाने रौद्र रूप धारण करीत दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया मच्छीमार विश्वास पाटील यांनी लोकमत कडे व्यक्त केली.