शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'देशाची माफी मागायला सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहू्र्त मिळणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:13 IST

खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदींना लक्ष्य केलंय.

ठळक मुद्देदेशात आज स्वातंत्र्यवीर. वि.दा. सावरकर यांची 138 जयंती साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत दिग्गज नेत्यांनी सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे

मुंबई - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर अद्याप धोका कायमच आहे. त्यामुळे, देशातील अनेक राज्यात अ्दयापही लॉकडाऊन असून जनजीवन पूर्ववत होण्यास अवधी लागणार आहे. त्यातच, गृहमंत्रालयाने 30 जून पर्यंत लॉकडाऊनबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे सूचवले आहे. कोरोनाच्या या सर्व मुद्द्यांबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदींना लक्ष्य केलंय. 

देशात आज स्वातंत्र्यवीर. वि.दा. सावरकर यांची 138 जयंती साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत दिग्गज नेत्यांनी सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे. मात्र, आजच्या जयंतीदिनाचा उल्लेख करत नितीन राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही, असे ट्विट करत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.  अंदमानच्या तुरुंगात कैद असताना सावरकर यांनी इंग्रजांना माफीचं पत्र लिहिलं होतं, असं सांगण्यात येतं. यापूर्वी राहुल गांधींनी जाहीर सभेत या माफीचा उल्लेख केला होता. मंत्री नितीन राऊत यांनी हाच धागा पकडत मोदींवर निशाणा साधला आहे. 

दुसऱ्या लाटेला मोदींची नौटंकीच कारणीभूत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये, कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर