मुंबई : अमेरिका आणि इराण युद्धामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी म्हटले. केंद्राने देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेबाबत आवश्यक पावले उचलली आहेत. तसेच, महाराष्ट्रात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
देशात घरगुती गॅसच्या दरात ६० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे इंधन तुटवड्याच्या चर्चांनी जोर पकडला असताना मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली.
इराणकडून नवे सर्वोच्च नेतृत्व जवळपास निश्चित
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईंच्या हत्येनंतर त्यांच्या जागी नव्या नेतृत्वाचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. पण न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तात, नव्या नेत्याची घोषणा सुरक्षेच्या कारणांमुळे विलंबित करण्यात आली आहे. अमेरिका-इस्रायलने कोणत्याही नव्या नावाला यापूर्वीच तीव्र विरोध केला आहे.
नाव जाहीर झाल्यास इस्रायल किंवा अमेरिका नेत्याला लक्ष्य करेल अशी भीती इराणला वाटत आहे. अमेरिकेने खामेनेई यांचा मुलगा मोजतबा याच्या नावास पूर्वीच आक्षेप घेतले आहेत. पण इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून मोजतबा यांची निवड करण्यासाठी मोठा दबाव टाकण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
तेहरानचे आकाश धुराने झाकोळले
इस्रायलने शनिवारी रात्री तेहरानमधील चार महत्त्वाच्या तेल साठवण केंद्रांवर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यात चार जण ठार झाले. हे हल्ले इतके अचूक होते की या तेल साठवण केंद्रांमध्ये स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला पसरल्या, हवेत कित्येक मीटर भडकलेल्या आगीचे लोळ दिसत होते. या साठवण केंद्रातील तेल रस्त्यावर आले व त्यानेही पेट घेतला. रविवार सकाळ उजाडताच तेहरानचे आकाश झाकोळले होते. त्यात पाऊस पडला, तोही काळ्या रंगाचा होता.
Web Summary : CM Fadnavis dispelled fuel shortage fears due to US-Iran tensions, citing central government measures and adequate state supplies. Domestic gas prices rose, but the CM urged against panic. Reports indicate Iran may have a new leader, while Tehran faced alleged Israeli airstrikes on oil facilities.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने अमेरिका-ईरान तनाव के बीच ईंधन की कमी की आशंकाओं को दूर किया, केंद्र सरकार के उपायों और पर्याप्त राज्य आपूर्ति का हवाला दिया। घरेलू गैस की कीमतें बढ़ीं, लेकिन मुख्यमंत्री ने आतंकित न होने का आग्रह किया। ईरान में एक नया नेता हो सकता है, जबकि तेहरान ने तेल सुविधाओं पर कथित इजरायली हवाई हमलों का सामना किया।