शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेना-मनसेच्या विचारधारेत फरक नाही"; राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येण्याचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:12 IST

दोघेही एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षाला निश्चित होईल असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.

मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपाची बोलणी सुरू झालीत. तर दुसरीकडे मनसेनेही मतदारसंघ निहाय आढावा घेत आहे. त्यातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटीमुळे शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचीमनसे एकत्र येणार का या चर्चेवर मनसे-शिवसेना यांची विचारधारा एकच आहे असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. 

संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेना शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विचारधारेत फरक नाही. पण युती करायची की नाही किंवा विचारधारेत फरक नसला तरी राजकीय मतभेद असू शकतात. पण युती करायची की नाही यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असं विधान त्यांनी केले आहे. 

तर राजसाहेबांसोबत आमची भेट झाली नाही. परंतु आमच्या नेत्यांना आम्ही सांगितलंय. राज ठाकरे आपल्यासोबत आले तर दोघांचे विचार मिळतेजुळते आहेत. दोघेही आघाडीचे नेते आहेत.दोघेही मास लीडर आहेत. दोघेही एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षाला निश्चित होईल. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राला त्यांची ताकद दाखवावी अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. 

दरम्यान, याआधीही आमदार शिरसाट यांनी असेच विधान केले होते. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकरणातील मोठा बॉम्बस्फोट असेल. राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि  फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या काही चर्चा नाही. निवडणुकीत प्रत्येकाला प्रत्येकाची आवश्यकता भासते. त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंद आहे असं शिरसाट यांनी म्हटलं होतं.   

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे