शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेबांचा शिवसैनिक अन् राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:33 IST

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर ते वाढले आहेत असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

मुंबई - बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जन्म दिला. पण आमच्यासारखे लाखो, करोडो कार्यकर्ते आहेत ज्यांना कर्माने बाळासाहेबांनी जन्म दिला. आमचा अधिकार त्यांच्याहून जास्त आहे. कर्माने बाळासाहेबांनी आम्हाला मोठे केले. बाळासाहेब एक विचार, एक संस्कार आणि आम्हाला पुढे घेऊन जाणारं मार्गदर्शक नेतृत्व होतं. बाळासाहेब संस्था आहे त्यावर आमचाही अधिकार असा टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे स्पष्ट आणि परखड बोलतात. त्यांच्या पोटात तेच ओठावर येते. राज ठाकरेंनी मुलाखतीत त्यांची भूमिका ठामपणे मांडली. राज यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोकांना त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो. राज ठाकरेंनी केलेले विधान, पत्र, भूमिका नेहमी चर्चेत राहते. तुम्हाला काय हवं हे राज ठाकरेंना बरोबर माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. पक्ष पुढे कसा न्यायचा. आम्ही आमची भूमिका पुढे घेऊन चाललो आहोत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर ते वाढले आहेत. बाळासाहेबांची सगळी भूमिका राज ठाकरेंना माहिती आहे. हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाईल अशी अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार बाळासाहेबांच्या विचाराने चालेल ही खात्री आहे असंही बाळा नांदगावकर म्हणाले. दरम्यान, मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे आणि तोच विचार राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना देत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यांच्यात काहीही फरक दिसत नाही असंही बाळा नांदगावकरांनी म्हटलं. 

बाळासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाहीछत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानतो जर त्यांच्या कुटुंबाने सांगितले महाराजांचे फोटो लावू नका, आंबेडकरांचे फोटो लावू नका. मग त्या त्या महापुरुषाला तुम्ही लहान करत नाही का? हे उद्धव ठाकरेंना कळालं नाही. बाळासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाही. स्मारक का बांधताय? ज्योत का पेटवली आहे? राज्यातील जनता तिथे नतमस्तक होते. शिवसेनाप्रमुखांना किती लहान करणार आहात? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला. 

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे