शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

"उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा 'गद्दार' कोणीही नाही, त्यांचा वाढदिवस 'गद्दार दिवस' घोषत करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:03 IST

Nitesh Rane vs Uddhav Thackeray: भाजपा आमदार नितेश राणेंनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला ट्वीट करून केली मागणी

Nitesh Rane vs Uddhav Thackeray: गेल्या वर्षी २० जूनला महाराष्ट्रात एक मोठा भूकंप झाला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सूरतला निघून गेले आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा हट्ट उद्धव ठाकरेंकडे केला. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास नकार दिल्यानंतर, एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली व भाजपासोबत सत्तास्थापना केली. या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याने आजचा दिवस 'विश्व देशद्रोही दिवस' (गद्दार दिवस) जाहीर करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या लोकांनी केली. मात्र, यावर भाजपच्या नितेश राणेंनी सडकून टीका करत उद्धव ठाकरेंनाच टोला लगावला. 

"उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी असतो. त्यांच्याएवढा मोठा गद्दार कोणीही नाही. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, हिंदुत्वाशी खोटेपणा केला, मराठी माणसांशी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाशी खोटेपणाने वागले. त्यामुळे २७ जुलै हा दिवस 'आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस' घोषित करावा. मला आशा आहे की संयुक्त राष्ट्र संघटना माझ्या या मागणीचा नक्की विचार करतील", असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वात मोठा 'अवली' उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा 'कवली'

"२७ जुलै हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस हा देशद्रोही दिन म्हणून साजरा करा, असा मी युनाटेड नेशन्सला ट्विट केले आहे. मुख्यमंत्री पदाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी द्रोह केला. देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 2019 सख्या भावासारखे उद्धव ठाकरेंना सांभाळलं. जी भाषा संजय राऊतांची, तीच भाषा उद्धव ठाकरेंची, उद्धव ठाकरे घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे. चांगले विचार देण्यासाठी वर्धापन दिन साजरा केला जातो. पण महाराष्ट्रात सर्वात मोठा 'अवली' उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा 'कवली", असा टोला नितेश राणेंनी लगावला.

तर दोन वर्धापन दिन झाले नसते!

"परवाच्या सभेतील थयथयाटामागे कारण कॅगचा अहवालानुसार होणारी कारवाई, ठाकरे आणि पाटणकर चे कपडे फाटले जाणार असा होता. पाटणकर, सरदेसाईंचे जेलमध्ये जायचे दिवस जवळ आलेत, पेंग्विन आदित्य ठाकरे 25-30 वर्षे मुंबईला कसं लुटलं त्याचे प्रेझेन्टेशन दाखवा. 33 देशांत ठाकरेंचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदीने लपवले आहेत. सरकारी भाचा सरदेसाई मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठी पाठी फिरतोय. बाळासाहेब कळले असते तर 2 वर्धापनदिन झाले नसते," अशी टीका त्यांनी केली.

"मुंबई पालिकेतील मस्ती बाहेर येणार आणि संजय राऊतांचा मालक जेल मध्ये जाणार. अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या काळात धर्मांतर, लव्ह जिहाद, लँड जिहाद माध्यमातून हिंदू खतरे मे, संजय राऊतांच्या मालकाने हिंदूंशी गद्दारी केली म्हणून आम्हाला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो. मुंबईत बांगलादेशी रोहिंगे वाढले, बेहरामपाडा मालवणी भागात त्यांना वीज पाणी ठाकरेंच्या सत्ता काळात bmcने पुरवले. पक्षात राहून उद्धव ठाकरेंना कोण संपवत असेल तर ते संजय राऊत", असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे