भयमुक्त कारभारासाठी बदल हवा
By Admin | Updated: July 4, 2016 02:05 IST2016-07-04T02:05:56+5:302016-07-04T02:05:56+5:30
सध्याचे सरकार कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून सामान्य नागरिकांना अन्नसुरक्षा आणि शिक्षण हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे.

भयमुक्त कारभारासाठी बदल हवा
पिंपरी : सध्याचे सरकार कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून सामान्य नागरिकांना अन्नसुरक्षा आणि शिक्षण हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी बदलांची गरज आहे, अशी टीका पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
शहर काँग्र्रेसच्या वतीने ‘काँग्रेस आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रविवारी पिंपरी बौद्धनगर येथील बुद्धविहारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार साठे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी महापौर कविचंद भाट होते. या वेळी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती भारती, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश महिला सरचिटणीस बिंदू तिवारी, आयोजक व शहर सरचिटणीस बाबा बनसोडे, हरेश बोधानी, हिरामण खवळे, सुरेश बनसोडे, दीपक जाधव, कल्पना बनसोडे, शिवानी भाट, बबलू तामचीकर, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष रहीम सैयद, युवक काँग्रेसचे मयूर जैस्वाल, एनएसयूआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, अॅड. क्षितिज गायकवाड, वामन ऐनिले आदी उपस्थित होते.
साठे यांनी महापालिकेत वाढत चाललेल्या भ्रष्टाचारावर कडक टीका केली. ‘भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर विकासासाठी काँग्रेसच एकमेव पर्याय असल्याने काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. बाबा बनसोडे स्वागत केले. नितीन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना बनसोडे यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
>विकासाच्या प्रवाहात काँग्रेसमुळे सर्व एकत्र
सचिन साठे म्हणाले, ‘‘देशातील
सर्वांत जुना पक्ष काँग्रेस असून, सर्वधर्मीयांना, दलित अल्पसंख्याकांना, शेतकरी, कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणणारा देशव्यापी एकमेव पक्ष आहे. काँग्रेसच सर्वसमावेशक पक्ष असल्याने गरिबांचा विकास करण्याच्या उद्देशाने इडब्ल्यूएस आणि एसआरए, घरकुल आवास योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. तसेच अन्नसुरक्षा कायदा आणि शिक्षण हक्क कायदा काँग्रेसने आणल्यामुळेच गरीब विद्यार्थ्यांनादेखील चांगल्या शिक्षण संस्थेत प्राथमिक शिक्षणासाठी मोफत प्रवेश मिळत आहे. ’’