शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

राज्यात खूप झाल्या शासकीय समित्या; संख्या कमी करण्याची शिफारस; काही समित्यांचे पुनर्गठन

By यदू जोशी | Updated: November 3, 2025 10:20 IST

SDO, तहसीलदारांना प्रशासकीय प्रमुख नेमण्याची सूचना

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तालुका ते विभागीय महसूल स्तरापर्यंत शासनाच्या अनेक समित्या आहेत. एकेका जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २५० समित्या असतात. समित्यांची ही मोठी संख्या कमी करावी, अशी शिफारस छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच शासकीय विभागांना आधी १०० दिवसांचा, तर नंतर दीडशे दिवसांचा प्रशासकीय सुधारणा आणि उपक्रमांचा कार्यक्रम दिला होता. त्या अंतर्गतच महसूल विभागांतर्गतच्या विविध शासकीय समित्यांच्या कामांचा आढावा घेऊन त्याबाबत शिफारशी करण्याची जबाबदारी पापळकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी राज्य सरकारला अहवाल सोपविला आहे. त्याचे सादरीकरणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर केले होते.

शिफारशीत काय म्हटले?

  • विभागीय स्तरावरील ६९, जिल्हा स्तरावरील १६०, उपविभागीय स्तरावरील १७, तर तालुकास्तरावरील १६ अशा २६२ समित्या कायम ठेवाव्यात. 
  • विभागीय स्तरावरील २, जिल्हा स्तरावरील २८, उपविभागीय आणि तालुकास्तरावरील प्रत्येकी एक अशा ३२ समित्या रद्द कराव्यात. 
  • ९३ समित्यांचे पुनर्गठन करावे.

अनेक समित्या कालबाह्य

कालबाह्य, अप्रासंगिक समित्यांमुळे अनावश्यक कामाचा भार येतो आणि वेळेचा अपव्यय होतो. जुन्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून समिती नेमलेली असते. त्याची जागा नव्या शासन निर्णयाने घेतल्यानंतरही जुनी समिती कायम ठेवली जाते, त्याची गरज नाही, असे मत पापळकर समितीने व्यक्त केले आहे. बऱ्याच समित्या कालबाह्य झाल्या आहेत. एकाच विषयासाठी विविध समित्या आहेत, त्याऐवजी समित्यांचे एकत्रीकरण करता येईल, असेही समितीने म्हटले आहे.

समन्वयासाठी प्राधिकृत अधिकारीच नाही

जिल्हाधिकाऱ्यांवरील समित्यांचा बोजा कमी व्हावा, अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे, यासाठी काही समित्या रद्द कराव्यात, उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांना (एसडीओ), तर तालुका स्तरावर तहसीलदारांना प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त करावे आणि त्यांच्या अखत्यारीतील विविध विभागांमध्ये समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी, असेही पापळकर यांनी सुचविले आहे. तालुका व उपविभागीय स्तरावर प्रशासकीय प्रमुख नसल्याने विविध शासकीय विभागांमध्ये समन्वयासाठी प्राधिकृत अधिकारीच नाही. त्यामुळे अडचणी येतात.

कुणाच्या अध्यक्षतेखाली किती समित्या?

  • जिल्हाधिकारी - २५०
  • विभागीय आयुक्त - ७८
  • उपविभागीय अधिकारी - ३५
  • तहसीलदार - २४

पुणे येथे घेतलेल्या महसूल परिषदेत सहा विभागीय आयुक्तांना विविध सुधारणा अहवाल तयार करण्यास सांगितले होते. विविध समित्यांची फेररचना हा त्याचाच भाग आहे. येत्या  मार्च अखेरपर्यंत सर्व शिफारशींवर अंमलबजावणी होईल.-चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Government to Reduce Redundant Committees; Reorganization Proposed

Web Summary : Maharashtra government plans to reduce the number of government committees after a review. A committee recommended scrapping 32 committees and reorganizing 93 others to streamline administration and reduce workload. The aim is to empower local officials and improve coordination.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार