हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री!

By Admin | Updated: October 28, 2014 02:30 IST2014-10-28T02:30:14+5:302014-10-28T02:30:14+5:30

मंत्री म्हणून ज्यांची नावे जाहीर होतील त्या नावांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत याच काळजीने भाजपा नेते धास्तावलेले आहेत.

There are no allegations of corruption charges! | हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री!

हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री!

अतुल कुलकर्णी - मुंबई 
‘ना खाऊंगा और ना खाने दूंगा,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याबाबत सातत्याने जाहीरपणो बोलत आहेत. अधिकारी आणि नेत्यांवर त्याचा किती परिणाम होतोय माहिती नाही; पण राज्यात सरकार बनवू पाहणा:या भाजपा नेत्यांवर त्याचा तणाव आत्तापासूनच जाणवू लागला आहे. मंत्री म्हणून ज्यांची नावे जाहीर होतील त्या नावांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत याच काळजीने भाजपा नेते धास्तावलेले आहेत.
केंद्रातल्या काँग्रेस प्रणीत सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करतच मोदी सरकार देशात सत्तेवर आले. अजूनही मोदी ‘झीरो टॉलरन्स’बद्दल बोलतच आहेत. अशावेळी राज्यात भाजपा सत्ता स्थापन करताना मंत्री म्हणून ज्यांना संधी देणार आहे त्यांची याआधीची कारकिर्द कशी होती, त्यांचा पूर्वइतिहास काय होता, याचा शोध घेऊनच नावे निश्चित करेल की पक्षात अनेक वर्षे आहेत, एवढाच निकष वापरेल, हे पाहणोदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे.
जेवढे पैसे भरू तेवढा टॉक टाइम मोबाइल सीम कार्डवर मिळतो. भाजपाचे काही नेते त्याच वृत्तीने रिचार्ज कार्डासारखे वागत आले. यावर माजी प्रभारी ओमप्रकाश माथूर यांनी ‘आम्ही राज्यात विरोधी पक्ष म्हणून आहोत का,’ असा सवाल खासगी बैठकीत केल्याचे एका नेत्याने सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील ‘विरोधी पक्षाचे नेते तोडपाणी करतात,’ असा जाहीर आरोप पत्रकार परिषदेत केला होता. या पाश्र्वभूमीवर अशा नेत्यांना मंत्रिमंडळात घेतले आणि त्यांचे मावळत्या सरकारमधील हितसंबंध बाहेर आले तर त्यावर कशी मात करायची याचीही जुळवाजुळव आत्तापासून सुरू झाली आहे. 
निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीमधून तब्बल 59 नेते आले. त्यापैकी 21 निवडून आले. त्यातल्या एकाही आमदाराला मंत्री म्हणून घेतले तर त्यांच्या पूर्वइतिहासावरून माध्यमे आणि विरोधक रान उठवतील. त्यांची जुनी प्रकरणो नव्या सरकारला चिटकू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्याचवेळी स्वपक्षातील सदस्यांबद्दलदेखील मोठी भीती पक्षातील नेत्यांना असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
भाजपाच्या वागण्या-बोलण्यातले अंतर स्पष्ट आहे. ते बोलतात एक आणि करतात दुसरेच. त्यांचे मंत्रिमंडळ जाहीर झाले की आम्ही जे म्हणतो ते स्पष्टपणो समोर येईलच, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
 
राज्यपालांचा आहेर नव्या सरकारच्या प्रतीक्षेत 
विद्यासागर राव यांना भाजपाने राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात पाठवले. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राव यांच्या नेतृत्वाखाली कारभार चालू आहे. त्यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या विरोधात दक्षता जागरूकता आठवडय़ाचा शुभारंभ केला.
‘आम्ही पारदर्शक व प्रामाणिक कारभार करण्याची शपथ घेत आहोत, भ्रष्टाचाराच्या निमरूलनासाठी आम्ही कठोरपणो काम करू, मनात भीती न ठेवता सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचे कर्तव्य पार पाडू,’ अशी शपथ कर्मचारी, अधिका:यांना दिली गेली. मात्र सरकारमध्ये जे मंत्री येतील त्यांचे काय, असा सवाल अनेक अधिका:यांनी केला. राज्यपालांचा हा आहेर नव्या सरकारच्या प्रतीक्षेत आहे.

 

Web Title: There are no allegations of corruption charges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.