रत्नागिरी : विरोधी पक्षनेता देण्याइतकी संख्याही विरोधकांकडे राहिलेली नाही. विरोधक हरल्यानंतर रोज निवडणूक आयोगाकडे जात आहेत. न्यायालयाला सल्ला देत आहेत. मग जिंकल्यावर ते आयोगाकडे का जात नाहीत, असा प्रश्न उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचे २३२ आमदार निवडून आले आहेत. ही योजना कधीही बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.शिंदेसेनेच्या बूथप्रमुखांचा मेळावा गुरुवारी (दि. १६) रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झाला. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार सुभाष बने, संजय कदम, राजन साळवी, सदानंद चव्हाण, राजन तेली, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक व अन्य उपस्थित होते.शिवसेना हे कुटुंब आहे. मी या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि तुम्ही माझी ताकद आहात. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, यासाठी तातडीने निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
Web Summary : Eknath Shinde questions why the opposition only approaches the Election Commission after losing. He highlighted the 'Ladki Bahin' scheme's success in securing 232 MLA seats and affirmed its continuation. Shinde emphasized his role as the head of the Shiv Sena family, promising Diwali relief for those affected by disasters with a ₹32,000 crore package.
Web Summary : एकनाथ शिंदे ने विपक्ष से सवाल किया कि वे जीतने के बाद चुनाव आयोग क्यों नहीं जाते। उन्होंने 'लाड़की बहीण' योजना की सफलता पर प्रकाश डालते हुए कहा कि इससे 232 विधायक चुने गए और यह योजना जारी रहेगी। शिंदे ने खुद को शिवसेना परिवार का मुखिया बताते हुए आपदा पीड़ितों के लिए दिवाली से पहले 32,000 करोड़ रुपये का पैकेज देने का वादा किया।