शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकऱ्यांच्या आंदोलनापेक्षाही भयानक आंदोलन होईल; मराठा आरक्षणावरून तुपकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 13:40 IST

शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, या मागणीला मान्य करत जरांगे पाटलांनी काल सायंकाळी उपोषण थांबविले आहे. परंतू, जर दगाफटका झाला तर मराठा समाज सहन करणार नाही, असा इशाराही पाटलांनी दिला आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मराठा समाजाकडून मुंबईची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असा इशारा दिला आहे. 

जरांगे पाटलांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता मराठ्यांना फिरविण्याच काम करू नये. मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. मराठा म्हणजे मरेल पण हटणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात जे दिल्लीत आंदोलन केले, त्यापेक्षाही भयानक आंदोलन राज्यात होईल. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. 

शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आता जर  सरकारने दगाफटका केला, तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. कोणत्या नाड्या बंद करायच्या तर आर्थिक आर्थिक नाडी बंद, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक अशा सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू.  असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना