शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"...तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजप नेत्याचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:59 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. तसेच या मुद्द्यावरून विरोधक संसदेमध्ये आक्रमक झाले आहेत. एवढेच नाही, तर सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढत याप्रकरणी उत्तर मागवले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केलेल्या टिप्पणीची बातमी रिट्विट करत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे. "सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. मग कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल", अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला आहे.

  

...तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ - सर्वोच्च न्यायालयमणिपूरमधील घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत तीव्र शब्दात भाष्य केले आहे. "हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ, असे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर आतापर्यंत काय अ‍ॅक्शन घेतली, यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तरही सर्वोच्च न्यायालयाने मागितले आहे. 

काय घडलं मणिपूरमध्ये?मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला, त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. या लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले. त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले. त्यानंतर २१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

टॅग्स :Atul Bhatkhalkarअतुल भातखळकरManipur Violenceमणिपूर हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय