शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Narayan Rane on Sanjay Raut: 'राऊत म्हणालेले, ...तर साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कपडे उतरविन'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:48 IST

Narayan Rane on Sanjay Raut press conference: राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही टोला नारायण राणे यांनी लगावला. 

संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे वेळ आल्यावर बाहेर काढणार. राऊत हे शिवसेनेचे नाहीत, पूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना शिवसेना संपविण्यास सांगितले आहे. ठाकरेंना हटव शिवसेनेची खूर्ची तुला देतो असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. तसेच सत्तास्थापनेच्या त्या रात्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेव्हा सिल्व्हर ओकवर शरद पवारांना भेटण्यास गेले तेव्हा राऊत हे एकटेच तिथे होते, असा आरोपही राणे यांनी केले.

साहेबांचे आणि उद्धवचे मी कपडे उतरवीन, मला पद दिले नाही तर पाहून घेईन असे हे संजय राऊत एकदा बोलले होते. याचा साक्षीदार माझ्याकडे आहे. त्याला हवा तेव्हा समोर आणतो. माझ्यासमोर साहेबांबद्दल बोलला असता तर तिथेच आडवा केला असता. आता पदे मिळालीत म्हणून हे पैसे कमवायला आलेत. संजय राऊत हे पगारी नेता आहेत, सामनामध्ये काम करतात, अशी टीकाही राणे यांनी केली.  

संजय राऊत यांना काल घाम फुटला. प्रवीण राऊतने ईडीला जी मुलाखत दिली त्यानंतर याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्याला आता अटक होणार हे समजले आहे. अनिल परब यांनाही अटक होणार आहे. आज सेना भवन आठवले का, असा सवालही राणे यांनी केला. राऊत यांनी कधी कोणाच्या कानाखाली वाजविल्याची बातमी ऐकली आहे का, रग लागते त्यासाठी. याच्यात रक्तच नाही, अशा शब्दांत राणे यांनी टिका केली. आम्ही मंत्री आहोत, ईडी सीबीआयकडे जाऊन बसलो तर राऊत यांची पळता भुई थोडी होईल असा इशारा राणे यांनी दिला. 

राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही त्यांनी टोला लगावला. यावेळी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना राऊत यांच्याबद्दल काय वाटायचे याबाबतची कात्रणेही राणे यांनी वाचून दाखविली. 

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊत