शिर्डी : दामदुप्पट करून देतो, असे सांगून औरंगाबाद व नाशिक येथील नागरिकांना तब्बल पाच कोटींना गंडा घालून फरार झालेल्या संशयिताला पोलिसांनी शिर्डीत नाट्यमयरित्या अटक केली़ हा आरोपी शिर्डीत नाव बदलून कुटुंबासह रहात होता़विजय प्रभाकर खोडगे (३५, रा़ औरंगाबाद) याने तीन वर्षांपूर्वी रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या आमिषातून औरंगाबाद व नाशिक येथील नागरिकांना पाच कोटींना गंडा घातला होता़ या प्रकरणी नाशिकचे पोलीस विजयच्या मागावर होते़ विजय शिर्डीतील वेणुगोपाल रेड्डी या व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (तालुका प्रतिनिधी)
‘तो’ संशयित शिर्डीत जेरबंद
By admin | Updated: March 15, 2015 01:24 IST