शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...मग शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करा; राष्ट्रपतीपदाच्या चर्चेवर आव्हाड यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 05:30 IST

राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई :

राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यावर राष्ट्रपती पदासाठी कशाला, शरद पवार यांच्याकडे आताच संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व द्यावे, अशी थेट भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे. 

विरोधकांकडे सक्षम पर्याय नसल्याने शरद पवार यांनाच राष्ट्रपती पदाचा उमेदवार करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशात प्रचंड जनसंपर्क असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश होते. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात रमणारे ते नेते आहेत. राष्ट्रपती भवनाच्या बंद दाराआडचे शाही राजकारण त्यांना आवडत नाही. राष्ट्रपती पदासाठी संख्याबळ पाहून निर्णय घ्यायला हवा. मात्र, माझे वैयक्तिक मत विचाराले तर शरद पवारांसारखे व्यक्तिमत्व राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात स्वत:ला कोंडून घेऊ शकत नाही, असे आव्हाड म्हणाले. 

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीला अजून अडीच वर्षे आहेत. या निवडणुकीसाठी संयुक्त आघाडी करावी लागणार आहे. त्यामुळे आताच शरद पवारांकडे संपुआचे प्रमुख पद द्यावे. आतापासून जुळवाजुळव केली तर २०२४ अवघड जाणार नाही. ही आघाडी करण्याची जबाबदारी जर आजच शरद पवार यांनी स्वीकारली तर निश्चितच येत्या दोन वर्षांत आपल्याला आवश्यक बदल दिसतील, असे आव्हाड म्हणाले. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कशाला ?यूपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव आल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, समर्थन असेल, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. तर आम आदमी पार्टीनेही पवारांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपती कशाला, मुख्य प्रवाहातील राजकारण सशक्त करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे यूपीएचे प्रमुख पद देण्याची भूमिका मांडली आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवार