...तर एक्स्प्रेस-वे बंद पाडणार

By Admin | Updated: June 6, 2016 03:04 IST2016-06-06T03:04:37+5:302016-06-06T03:04:37+5:30

एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्र्यांना १० हजार पत्रे पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे.

... then the Express-Way will be stopped | ...तर एक्स्प्रेस-वे बंद पाडणार

...तर एक्स्प्रेस-वे बंद पाडणार

मुंबई : एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्र्यांना १० हजार पत्रे पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही, तर सर्व चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांसोबत एक्स्प्रेस-वे बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एक्स्प्रेस-वेवर होणारे अपघात आणि त्यात बळी पडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांना १० हजार पत्रे पाठविण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. १५ जूननंतर मुख्यमंत्र्यांना ही पत्रे सादर करणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना उपाययोजना राबवण्यासाठी एक ते दीड महिना दिला जाईल. त्यानंतरही उपाययोजना करण्यात आली नाही, तर एक्स्प्रेस-वे बंद पाडला जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: ... then the Express-Way will be stopped