ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी

By Admin | Updated: June 11, 2017 12:06 IST2017-06-11T12:06:22+5:302017-06-11T12:06:22+5:30

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Theft in veteran singer Prabha Atre's bungalow | ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अत्रे यांच्या बंगल्यातून चोरट्याकडून मोबाईल चोरण्यात आले आहे. जंगली महाराज रस्त्यालगत अत्रे यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात सध्या कोणी राहायला नाही, अत्रे यांच्या संस्थेकडून तेथे नियमित शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम घेतले जातात. बंगल्याच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी तेथे ठेवलेले मोबाईल संच लांबविण्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून अत्रे यांच्या बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांकडून करण्यात आलेले चित्रीकरण पडताळण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

Web Title: Theft in veteran singer Prabha Atre's bungalow