शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अजब चोरी : चोरांची शिजली 'डाळ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 21:41 IST

शहरात सध्या पोलिस आणि नागरिकांपेक्षा बारीक सारीक गोष्टींवर चोरट्यांचेच अधिक लक्ष असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देचोरट्यांनी चोरली १ किलो डाळीची पिशवीसिंहगड रोडवरील मंदिराजवळील घटना

पुणे : शहरात सध्या पोलिस आणि नागरिकांपेक्षा बारीक सारीक गोष्टींवर चोरट्यांचेच अधिक लक्ष असल्याचे दिसत आहे.  तुरडाळ, कांदे महाग झाले की त्यावरचे विनोद व्हायरल होत असतात़ पण चोरट्याने प्रत्यक्षात डाळ चोरुन नेली तर ? अशी घटना सिंहगड रोडवरील सनसिटी येथे घडली आहे़ चोरट्यांनी मौल्यवान ऐवज असल्याचे समजून हरभरा डाळ असलेली पिशवी चोरुन नेली़ आहे. स्वप्नील शिवानंद कुलकर्णी (वय २५, रा. प्रयेजा सिटी, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील कुलकर्णी हे विद्यार्थी असून, ते सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरगुती किराणा घेण्यासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी करड्या रंगाची पिशवी सोबत आणली होती. त्यांनी एका दुकानातून ५०० रुपयांची रिवाईटलची बॉटल आणि ९० रुपयांची १ किलो हरभरा डाळ घेतली. तसेच, जुना पासपोर्ट आणि त्याच्या काढलेल्या दोन झेरॉक्स प्रतही या पिशवीत ठेवल्या. त्यानंतर ते सनसिटी रोडवरील आनंदनगरमध्ये असणाºया हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांनी रोडच्या कडेला काही क्षणांसाठी दुचाकी उभी केली व पिशवी दुचाकीला अडकविली. काही मिनिटांनी ते परत आले तर दुचाकीची पिशवी गायब. पिशवी न सापडल्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेतली़. पोलिसांनीही त्यांची फिर्याद दाखल करुन घेतली आहे़  पोलिस हवालदार आर. आय. शेख हे  अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीPoliceपोलिस