दीड लाखांच्या श्वानाची चारकोपमध्ये चोरी

By Admin | Updated: March 4, 2017 01:47 IST2017-03-04T01:47:40+5:302017-03-04T01:47:40+5:30

एका विदेशी जातीच्या कुत्र्याची चोरी करण्याचा प्रकार चारकोपमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली आहे.

Theft of one and a half million cash in the charcoal | दीड लाखांच्या श्वानाची चारकोपमध्ये चोरी

दीड लाखांच्या श्वानाची चारकोपमध्ये चोरी


मुंबई : एका विदेशी जातीच्या कुत्र्याची चोरी करण्याचा प्रकार चारकोपमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली आहे. मात्र चोरीला गेलेला कुत्रा अद्याप सापडलेला नाही.
चारकोपच्या म्हाडा परिसरात सुधीर (नावात बदल) यांनी एक कुत्रा विकत घेतला होता. या कुत्र्याची किंमत दीड लाख रुपये असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २७ डिसेंबर, २०१६ रोजी त्यांच्या घराच्या डागडुजीचे काम सुरू होते. त्या वेळी त्यांनी चारकोपच्या पूजा बिल्डिंग परिसरात असलेल्या एका चायनिजच्या गाडीजवळ या कुत्र्याला रात्री बांधून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास ते कुत्र्याला नेण्यासाठी आले. मात्र तो कुठेच सापडला नाही. चारकोपमध्ये परिसरात त्यांनी कुत्र्याचा शोध घेतला. तरीदेखील त्याचा शोध लागला नाही. अखेर त्यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक कारचालक कुत्र्याला गाडीत नेत असल्याचे आढळून आले. या गाडीवर एका एनजीओचे नाव लिहिलेले होते. त्यानुसार त्यांनी गाडीचा शोध घेतला पण श्वास सापडले नाही़(प्रतिनिधी)

Web Title: Theft of one and a half million cash in the charcoal