शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभराची चिंता मिटली; महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण १०० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:15 IST

यंदा १६ दिवस उशीर लागला : सर्व प्रमुख सहा प्रकल्प भरले

सातारा : जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून पाऊस सुरूच असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरणही शनिवारी सकाळी १०० टक्के भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तरीही यंदा गतवर्षीपेक्षा १६ दिवस उशिरा धरण भरले. याचबरोबर कोयनेसह इतर पाच प्रमुख प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराची चिंता मिटलेली आहे.जिल्ह्यात यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला. त्यानंतर जूनमध्येही मान्सूनचा पाऊस जोरदार झाला. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यातच पावसाचा जोर वाढल्यानंतर या धरणांमधूनच विसर्ग करावा लागला. सध्या सप्टेंबर महिना सुरू असून पूर्व भागात परतीचा पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे.शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १, नवजा ४ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणात सात हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यातच धरण काठावर आले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे प्रकल्प १०० टक्के भरल्याचे धरण व्यवस्थापनाने जाहीर करून टाकले.तरीही यंदा कोयना धरण भरण्यास उशीर लागला आहे. कारण, मागील वर्षी ४ सप्टेंबरलाच धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला होता. दरम्यान, धरण भरल्याने चार वक्र दरवाजे एक फुटाने उचलून ६ हजार ४०० आणि पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ८ हजार ५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जात होता.