शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांचे काम खोळंबले! नऊपैकी ५ मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी २ वर्षांपासून फक्त सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 06:53 IST

कोपेश्वर मंदिर, गोदेश्वर मंदिर, आनंदेश्वर, मार्कंडेश्वर मंदिर ही मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) अखत्यारीत मोडतात.

- अमर शैलामुंबई : राज्यातील नऊ प्राचीन मंदिरे आणि लेणी-शिल्पे यांचे संवर्धन करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे काम राज्य सरकारने दोन वर्षांपासून हाती घेतले. मात्र, त्यातील कार्ला येथील एकवीरा देवीसह पाच मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात भारतीय पुरातत्त्व विभागाने सातत्याने खोडा घातल्याने ते काम कधी मार्गी लागेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

कार्ले येथील एकवीरा मातेचे मंदिर, रत्नागिरीतील धूतपापेश्वर मंदिर, कोल्हापूरमधील खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, नाशिक सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, छत्रपती संभाजीनगरचे खंडोबा मंदिर, बीडचे पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तम मंदिर, अमरावतीतील लासूर येथील आनंदेश्वर मंदिर, गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिर, साताराचे उत्तेश्वर मंदिर यांचे या प्रकल्पांतर्गत संवर्धन करण्यात येणार होते. मात्र, केवळ चार मंदिरांच्या जीर्णोद्धाराची कामे सुरू झाली. हे काम सरकारने २०२१ मध्ये हाती घेतले. त्याची जबाबदारी एमएसआरडीसीवर देण्यात आली. 

कोपेश्वर मंदिर, गोदेश्वर मंदिर, आनंदेश्वर, मार्कंडेश्वर मंदिर ही मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) अखत्यारीत मोडतात. तर एकवीरा माता मंदिर परिसरात लेणी असल्याने जीर्णोद्धारासाठी एएसआयची परवानगी आवश्यक आहे. मात्र, त्यांनी दोन वर्षांत त्यासाठी परवानगी तर दिली नाहीच; उलट एएसआयकडून वारंवार बदल सुचविले जात आहेत. 

उत्तेश्वर मंदिर, विकासासाठी निविदा साताऱ्यातील उत्तेश्वर मंदिर वन विभागाच्या जागेत आहे. त्याच्या संवर्धनासाठी अद्याप वन खात्याची परवानगी मिळालेली नाही. सुविधा उभारण्यासाठी वन खात्याच्या परवानगीची गरज नाही. भक्त निवास, भोजनालय आदींची कामे सुरू केली आहेत. महाबळेश्वर येथून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची कामेही सुरू आहेत.

‘येथे’ जीर्णोद्धार सुरूरत्नागिरी येथील धूतपापेश्वर मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथील खंडोबा मंदिर, बीडमधील भगवान पुरुषोत्तम मंदिर तसेच साताऱ्याच्या उत्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराची पहिल्या टप्प्यातील कामे सुरू केली आहेत.  

टॅग्स :Templeमंदिर