शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
3
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
4
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
5
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
6
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
7
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
9
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
10
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
13
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
14
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
15
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
16
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
17
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
18
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
19
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:47 IST

रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या कुरघोडी अजूनही सुरूच आहेत.

अलिबाग :रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या कुरघोडी अजूनही सुरूच आहेत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे डिवचले असून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 'एकला चलो'चा नाराही दिला आहे. तटकरे यांनीही कोणाच्या टीकेला महत्त्व देत नसल्याचे सांगत दळवी यांच्या टीकेला उत्तर दिल्याने जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला आहे.महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड जिल्ह्यात विस्तव जात नाही. पालकमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांत उघड-उघड वाद पेटलेला आहे. खासदार सुनील तटकरेंवर टीका करण्याचा विडाच जणू शिंदेसेनेच्या आमदारांनी उचलला आहे. आमदार महेंद्र थोरवे, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड करीत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेत शिंदेसेनेचे 'एकला चलो रे'१. रोहा येथील कार्यक्रमात आ. दळवी यांनी खा. तटकरेंसोबत जाणार नसल्याचे सांगत जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका जाहीर केली आहे.

२. जे सोबत येतील त्यांना घेऊन, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय लढण्याची ताकद तयार केली आहे. नवरात्रोत्सव संपल्यानंतर दिवाळी असून, शिवसैनिकांनो असा फटका वाजवा की, तटकरे घराबाहेर पडले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केले आहे.

सभ्यतेतून वैचारिक पातळीवर उत्तर देणारखा. सुनील तटकरे यांनीही आ. महेंद्र दळवी यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. कोणाच्या टिकेला महत्त्व देत नाही, टिकेला उत्तर देण्यासाठी प्रवक्ते ठेवले आहेत. आमच्या पक्षाने सभ्यता पाळली आहे.

सभ्यतेच्या माध्यमातून वैचारिक पातळीवर उत्तर देऊ. खालच्या पातळीवरील टीका पाहायला मिळत असते, अशावेळी फारसे फरक पडत नाही, असे उत्तर तटकरे यांनी दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dalvi, Tatkare trade barbs; Guardianship dispute escalates in Raigad!

Web Summary : Raigad witnesses escalating conflict between Shinde Sena and NCP over guardianship. Dalvi challenged Tatkare, declaring 'Ekla Chalo' for local elections. Tatkare responded with a promise of a thoughtful reply.
टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबागsunil tatkareसुनील तटकरे