शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हात सुटला अन् पार्वतीची जाऊ सरस्वती बुडाली, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अन् होत्याचे नव्हते झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 08:22 IST

Nanded Tractor Accident:  नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील  भुईमूग निंदनासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला. तर तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

 नांदेड  - जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील  भुईमूग निंदनासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला. तर तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ट्रॅक्टरच्या हेडची समोरील दोन्ही चाके वर झाली आणि काही कळायच्या आत ट्रॉलीसह मजूर महिला विहिरीत कोसळल्या. प्रत्येकाने आपला जीव वाचविण्यासाठीची धडपड केली. त्यात पार्वती बुरड यांच्या हाती पाइप लागला अन् त्यांनी लगेचच आपली जाऊ सरस्वतीचा धावा करीत तिला आवाज दिला, तिने हातही दिला. पण, तो निसटला अन् सरस्वती बुडून तिचा मृत्यू झाला. या दोन्ही जावांसोबत सासू कांताबाई बुरड दररोज कामाला येत असतात. पण, शुक्रवारी त्यांना वसमतला जायचे असल्याने त्या घरीच थांबल्या. या अपघातापासून त्या बचावल्या असल्या तरी सुनेच्या मृत्यूने त्या पुरत्या खचल्या आहेत. तान्हुल्यासह तीन लेकरं सोडून गेलेल्या सरस्वतीच्या मृत्यूने कांताबाईचे अश्रू थांबत नव्हते.

हे सर्व मजूर वसमत तालुक्यातील गुंजजवळील लहूजीनगर वस्तीवरील रहिवासी होते. वस्तीवर घटनेची माहिती पोहोचताच आक्रोश झाला. लहान मुले आपली आई सुखरुप आहे का? असा प्रश्न विचारत आक्रोश करीत होते.  

बाप कसाबसा वाचला, पण  माय-लेकीला मृत्यूने गाठले अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये सटवाजी जाधव व त्यांच्या पत्नी ताराबाई आणि मुलगी धुरपता होत्या. ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर मोटारीचा पाइप आणि दोरीच्या साहाय्याने सटवाजी हे वरआले. मात्र, त्यांच्या पत्नी आणि मुलीचा बुडून मृत्यू झाला.  

तीन लेकुरवाळींच्या मृत्यूने नऊ चिमुकले झाले पाेरके आलेगावमधील दुर्घटनेत तीन लेकुरवाळ्या बायकांसह दोन १८ वर्षांच्या मुलींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे जवळपास ९ चिमुकले पाेरके झाले. यामध्ये दोन ते दहा वर्षांच्या मुला-मुलींचा समावेश आहे. घटनास्थळी आलेल्या चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.विहिरीत बुडून मृत झालेल्या ज्योती सरोदे यांना दोन मुले, एक मुलगी आहे. सपना राऊत यांना दोन मुली, एक मुलगा आणि सरस्वती बुरड यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यातील अनेकांना तर काय घडले? हीदेखील समज नाही. या अपघातात वाचलेल्यापैकी पुरभाबाई कांबळे यांची मुलगी सीमरण संतोष कांबळे (१८)हिचा मृत्यू झाला. पुरभाबाईला आपली लेक विहिरीतच असल्याचे समजताच तिने  धाव घेतली. पण, उपस्थितांनी तिला धीर देत एका झाडाखाली सावलीला नेले. 

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात