शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Rajendra Gavit : शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा, राजेंद्र गावितांनी दिलं असं स्पष्टीकरण, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 13:15 IST

Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं वृत्त फेटाळलं असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केवळ सदिच्छा भेट घेतली होती, असा खुलासा त्यांनी केला आहे.

मुंबई - शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी मतदारसंघातील अनेक नगरसेवक, जिप सदस्य आणि आमदारांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, आता राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं वृत्त फेटाळलं असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केवळ सदिच्छा भेट घेतली होती, असा खुलासा त्यांनी केला आहे.

राजेंद्र गावित याबाबत स्पष्टिकरण देताना म्हणाले की, मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदारसंघातील काही कामांनिमित्त सदिच्छा भेट घेतली. मी शिंदे गटात प्रवेश केलेला नाही. शेवटी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कुठल्याही मतदारसंघातील तसेच पक्षातील लोक भेटू शकतात.माझ्या मतदारसंघातील अनेक नगरसेवक, जिप सदस्य हे शिंदे गटात गेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र माझ्यापुरता प्रश्नविचारल्यास मी केवळ सदिच्छा भेटीसाठी गेलो होते. मी शिंदे गटात गेलेलो नाही, असं राजेंद्र गावित यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, वसई - विरार मनपातील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारला आपला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच वसई तालुका आणि बाईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये यांनीही हाच निर्णय घेतला आहे. या सगळ्यांच्या साथीने शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, माजी पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा तसेच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते, मात्र आता राजेंद्र गावित यांनी आपण शिंदे गटात गेलो नसल्याचे सांगितल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेpalgharपालघर