शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचे गणेश विसर्जन दणक्यात; ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 05:36 IST

‘एनजीटी’ने ढोल-ताशा-झांज पथकांमध्ये ३० पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते, ‘एनजीटी’ने घातलेल्या निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

पुणे/नवी दिल्ली - गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आता कितीही ढोल-ताशा पथकांची संख्या असणार आहे. त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परिणामी विसर्जन मिरवणुकीचा वेळ लांबण्याची शक्यता आहे. ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे ढोल-ताशा पथकांनी स्वागत केले आहे.  तसेच, यंदाचे ढोल वादन चांगले होईल, अशी भावना गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली आहे. 

पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. गणेश विसर्जन मिरवणूक हा तर या उत्सवाचा परमोच्च बिंदू असतो. त्या मिरवणुकीत ढोल-ताशा वादन पाहणे हा एक अनुपम सोहळा असतो. परंतु, राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) एका निर्णयामुळे ढोल-ताशा पथकांच्या उत्साहाला मर्यादा आल्या होत्या. मात्र आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय घेऊन ढोल-ताशा पथकांना दिलासा दिला आहे.

‘एनजीटी’ने ढोल-ताशा-झांज पथकांमध्ये ३० पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी झाली. तेव्हा एनजीटीचा मर्यादेवरील निर्णयाला स्थगिती दिली. परंतु, उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एनजीटीने जारी केलेल्या इतर निर्देशांना विरोध नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

एनजीटीचे हे होते आदेश

‘एनजीटी’ने ३० ऑगस्ट ढोल-ताशा पथकांबाबत निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जन मिरवणुकीदरम्यान रिअल टाईम ध्वनी प्रदूषण मोजावे.  पोलिसांनी ढोल-ताशा-झांज पथकात ३० पेक्षा जास्त सदस्य नसावेत, याची खात्री करावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी साहित्य जप्त करावे, असेही आदेशात ‘एनजीटी’ने म्हटले होते.

मंडळांकडून स्वागत अन् पथकांमध्ये उत्साह

पुणे हे गणेशोत्सवाचे केंद्रबिंदू असल्याने इथे निर्बंध आणणे योग्य नव्हते. हरित लवादाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते. एकतर्फी निर्णय झाला होता. पण आता सरन्यायाधीशांनी स्थगिती दिल्याने सर्वांना दिलासा मिळाला. तरी ५ तारखेला सुनावणी असेल तेव्हा आम्ही म्हणणे मांडू.- पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा पथक महासंघ

आवाजाचे प्रदूषण डीजेमुळे होते. ढोल-ताशा हे पारंपरिक वाद्य आहेत. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे खूप गोंगाट किंवा प्रदूषण होत नाही. - कृणाल घारे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGaneshotsavगणेशोत्सव